ITBP Viral Video : १५,००० फूट उंचीवर भारत-तिबेट सीमा पोलीसांचा ”हाऊ इज द जोश”  | पुढारी

ITBP Viral Video : १५,००० फूट उंचीवर भारत-तिबेट सीमा पोलीसांचा ''हाऊ इज द जोश" 

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

भारत-तिबेट सीमा  पोलिसांचा (Indo-Tibetan Border Police) पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (ITBP Viral Video) होत आहे. यामध्ये ते व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत.

थंडी, वारा, हिमवर्षाव याची तमा न बाळगता भारत-तिबेट सीमा पोलीस  गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांवर  प्राणपणाने रक्षण करत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेकवेळा आपल्या कर्तृत्वाने सर्वांची मान अभिमानाने उंचावली आहे.  त्यांचा व्हॉलिबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ITBP Viral Video : काय आहे व्हिडिओमध्ये?

भारत-तिबेट सीमा पोलीस गोठवणाऱ्या २० डिग्री सेल्सियस थंडीमध्येही  उत्तराखंड सीमेच्या एका चौकीवर १५,००० फूट उंचीवर व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत. गोठवणाऱ्या थंडीतही ते आनंद मिळवत आहेत.  त्यांचा हा व्हिडीओ आयटीबीपीने (ITBP) आपल्या ट्विटर अकाउंटवर ” ”हाऊ इज द जोश”   असं कॅप्शन आणि #Himveers असा हॅशटॅग देत शेअर केला आहे

ITBP-भारत-तिबेट सीमा पोलीस

भारत-तिबेट सीमा पोलीस दल देशातील आघाडीचं निमलष्करी दल आहे. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.  भारत-तिबेट सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police) म्हणजेच ‘आयटीबीपी’ची स्थापना १९६२ च्‍या भारत-चीन युद्‍धानंतर २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली. भारत-तिबेट सीमा पोलीस हे लडाखमधील काराकोरम (Karakoram) पासून ते अरूणाचल प्रदेश मधील जाचेप (Jachep ) यापर्यंत ३,४८८ किमी लांब भारत-चीनच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. या सेनेने १९६५ साली झालेल्या भारत-पाकच्या संघर्षातही सहभाग घेतला होता. आयबीला (Intelligence Bureau India) सोबत घेवून सीमेपलीकडून होणाऱ्या गुप्त सूचनांची माहिती घेते.

हेही वाटलतं का? 

Back to top button