Hatke Recipe : आयस्‍क्रीम रोल विथ ढोकळा अँड खांडवी ! Viral Video | पुढारी

Hatke Recipe : आयस्‍क्रीम रोल विथ ढोकळा अँड खांडवी ! Viral Video

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या देशातील खाद्य संस्‍कृती ही जगाला अचंबित करणारी. त्‍यामुळेच विदेशातील नागरिकांना ‘इंडियन फूड’बद्दल नेहमीच कुतूहल असतं. (Hatke Recipe) आपल्‍याकडे नवनवीन रेसीपी शोधण्‍याचाही फंडाही अचाटच. दिल्‍लीतील एका अवलियाने तुम्‍ही कधी विचारही केला नसेल अशी एक भन्‍नाट रेपीपी तयार केली आहे. आता या रेसिपीचा द ग्रेट इंडियन फुडीच्‍या इंस्‍टा पेजवर पोस्‍ट केला. काही तासांमध्‍ये तो नेटकर्‍यांच्‍या पसंतीस उतरत आहे.

Hatke Recipe : तिन्‍ही चवींची मेजवानीच

ढोकळा आणि खांडवी हे गुजरातमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ. आपल्‍याकडेही ते चवीने खाल्‍ले जातात. मात्र तुम्‍ही कधी कल्‍पना केली नसेल अशी रेसिपी केली आहे. या बहाद्दराने त्‍याने खांडवी आणि ढोकळा याबरोबरआयस्‍क्रीमचे मिश्रण केले. आणि पुन्‍हा ढोकळा पीस ठेवून त्‍याला मिरचीने सजवले. त्‍याने या दोन पदार्थ आणि व्‍हेनिला आयस्‍क्रीमच्‍या मिश्रणाने केलेली ही नवी रेसिपी चांगलीच व्हायरल झाली आहे. विशेष म्‍हणजे त्‍याने या डिशवर हिरव्‍या मिरची ठेवत गोड, काहीसे तिखट अशा चवींची मेजवानीच या डिशमधून दिली आहे.

या भन्‍नाट रेसिपीच्या व्‍हिडिओला लाखो व्‍ह्‍यूज मिळात आहे. त्‍याचबरोबर या हटके रेसिपीसारख्‍या हटके काॅमेंट्सही मिळत आहेत. आता तुम्‍ही ही नवी रेसिपी घरी ट्रॉय करणार?

याही रेसीपी वाचा :

Back to top button