Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा; “हे हेराफेरी सरकार, एकाने मारल्यासारखे…”

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री  एकनाथ सिंगे यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करणाऱ्या आशयाच पत्र शेअर करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. (Vijay Wadettiwar)

Vijay Wadettiwar : जनतेला मूर्ख बनवू पाहणारे सरकार

विजय वडेट्टीवार यांनी दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र शेअर करत एक पोस्ट आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,

"महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही. त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात 'क्रिम पोस्ट'वर बदली मिळाली.

मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्‍याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे."

काय आहे केसरकरांच्या पत्रात

दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना जालन्याचे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची झालेल्या बदली आदेशास स्थगिती देणेबाबतपत्र लिहले आहे. त्या पत्रात म्हटलं आहे की,
"
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने श्री. तुषार दोषी, पोलिस अधिक्षक जालना यांची दि.२० नोव्हेंबर २०२३ च्या गृह विभाग यांचे आदेशाप्रमाणे पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे बदली करण्यात आली आहे. वास्तविक श्री. तुषार दोषी यांचेवर आंतरवली सराटी, जिल्हा जालना येथे मराठा अंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यात दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये त्यांची याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने ती पूर्ण होईपर्यंत त्यांचे बदली आदेशास स्थगिती देण्याबाबत विनंती आहे."
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news