सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : स्पर्शरंग कलापरिवाचे विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर यांनी यंदा कलेचा उपयोग करून फ्रेमच्या तुकड्या पासून 22×22 फूट वैष्णोदेवीची (Vaishno Devi) प्रतिमा साकारलेली आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी 200 किलो तुकडे लागले आहेत. यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागलेला आहे. यामध्ये दोन प्रकारच्या फ्रेम्स होत्या. काळा आणि गोल्डन असे दोन कलरचे फ्रेम होते. हे सर्व फ्रेमचे तुकडे मादास फ्रेम्स यांच्याकडे तुकडे पडलेले होते. त्यापासून काय करता येईल का अशा प्रश्न पडला आणि कलाकारांनी त्यांच्याकडून ते तुकडे घेऊन प्रतिमा साकारलेली आहे.
स्पर्शरंग कलापरिवारचे चित्रकार व विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर , शुभम सब्बन , प्रमोद वडनाल, श्रीगोंविद धोत्रे, वैष्णवी चराटे, राधाराणी रापेल्ली या सर्व कलाकारांनी ही प्रतिमा तयार केली.
हेही वाचलंत का?