Israel Hamas War | हमास- इस्रायल युद्ध आणखी पेटणार, अमेरिकेची युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात दाखल

Israel Hamas War | हमास- इस्रायल युद्ध आणखी पेटणार, अमेरिकेची युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इस्रायल आणि हमासच्या संघर्षादरम्यान अमेरिकेच्या नौदलाचा विमानवाहू युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड कॅरियर स्ट्राइक ग्रुप पूर्व भूमध्य समुद्रात दाखल झाला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड कॅरियर स्ट्राइक ग्रुप हा अमेरिकेच्या नौदलाचा मोठा ताफा मानला जातो. अमेरिकेने इस्रायलच्या मदतीसाठी नौदलाचा ताफा पाठवल्याने युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकप्रकारे हा ताफा पाठवून अमेरिकेने हमासला मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे. (Israel Hamas War)

संबंधित बातम्या 

या स्ट्राइक ग्रुपमध्ये यूएसएस नौदलाची विमानवाहू युद्धनौका USS गेराल्ड आर. फोर्ड (CVN 78) त्याच्या ८ स्क्वॉड्रन ऑफ अटॅक आणि सपोर्ट एअरक्राफ्ट आणि टिकोनडेरोगा क्लास गाइडेड मिसाइल क्रूझर USS Normandy (CG 60) तसेच अर्ले बर्क क्लास गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक यूएसएस थॉमस हडनर (DDG 116), यूएसएस रमागे (DDG 61), यूएसएस कार्ने (DDG 64) आणि यूएस रूझवेल्ट (DDG 80) यांचा समावेश आहे.

८ ऑक्टोबर रोजी यूएस डिपार्टमेंट ऑफ डिपार्टमेंटच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले होते की, "मी यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड कॅरियर स्ट्राइक ग्रुपला पूर्व भूमध्य समुद्राकडे जाण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेने इस्रायलवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की ते इस्रायलशी सतत संपर्क ठेवून आहेत आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करु.

३ हजार मृत्यू

दरम्यान, हमास दहशतवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिकेचे शस्त्रसाठा वाहून नेणारे पहिले विमान इस्रायलमध्ये उतरले आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंकडील सुमारे ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे की, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात शनिवारपासून २२,६०० हून अधिक इमारती आणि १० आरोग्य सुविधा केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच ४८ शाळांचे नुकसान झाले आहे. (Israel Hamas War)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news