Urvashi Rautela : ऋषभ पंतसाठी उर्वशीचं देवाकडं साकडं, पण फोटो टाकल्याने ट्रोल

Rishabh Pant -Urvashi Rautela
Rishabh Pant -Urvashi Rautela
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. (Urvashi Rautela) ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना दिल्ली-डेहराडून महामार्गावर हा कार अपघात झाला. ऋषभला पाठ, पाय आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, त्याची तथाकथित गर्लफ्रेंड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने त्याच्यासाठी प्रार्थना केल्याची माहिती समोर आलीय. (Urvashi Rautela)

उर्वशीने ऋषभचे नाव न घेता त्याच्यासाठी प्रार्थना केल्याचे वृत्त समोर आले आहे. नेटिझन्सनी तिच्या या कॅप्शनवर तत्काळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले-रुरकी रुग्णालयात आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे- लक्ष वेधण्यासाठी ही पोस्ट करण्यात आलीय.

ऋषभच्या फॅन्सनीदेखील तो तत्काळ बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

दुसरीकडे उर्वशीने एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून नेटकरी म्हणत आहेत की, RP भाईचा अपघात झालाय अन् तू इकडे हॉट होऊन फिरत आहेस. अनेक नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, ऋषभला उपचारासाठी डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या कपाळाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ऋषभची कार दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर कारला आग लागली. यात ऋषभ गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला दिल्ली रस्त्यावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नातेवाईकांना भेटण्यासाठी तो रुरकीला जात होता. नारसनपासून रुरकीच्या दिशेने १ किमी. पुढे जात असताना तो स्टिअरिंग व्हीलवर  झोपल्यामुळे हा अपघात झाला.. यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ऋषभ पंत कारमधून दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत होता. रुरकी येथे त्याचे घर आहे. दरम्यान, नारसन जवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला आणि खांबाला जाऊन धडकली. यामुळे कारला आग लागली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news