Sushant Singh Rajput : सुशांतचा मृत्यूच्या आधीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून रियावर आरोप | पुढारी

Sushant Singh Rajput : सुशांतचा मृत्यूच्या आधीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून रियावर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेते सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन २ वर्ष झाले आहेत. परंतु, त्याच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. कूपर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने नवा दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर जखमांचे निशाण होते. हे प्रकरण पुन्हा चर्चिले जात आहे. या दरम्यान, सुशांतचा (Sushant Singh Rajput ) आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून फॅन्सनी सुशांतच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिलाय. त्याचबरोबर, नेटिझन्सनी त्याची तथाकथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप देखील केले आहेत. (Sushant Singh Rajput )

सुशांतचा जुना व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील कूपर रुग्णालयात सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर पोस्टमार्टम झाले होते. शवविच्छेदनगृहातील एका कर्मचाऱ्याने दावा केला की, सुशांतच्या शरीरावर अनेक निशाण होते. गळ्यावरदेखील दोन-तीन निशाण होते. या सर्व दाव्यांदरम्यान, आता पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशांतच्या फॅन पेजवर अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी दावा केला आहे की, हा व्हिडिओ सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीचा व्हिडिओ आहे आणि हा रियाने रेकॉर्ड केला आहे.

सुशांतचा व्हिडिओ त्याच्या मृत्यूच्या आधीचा सांगितला जात आहे. व्हिडिओमध्ये सुशांत खूप आजारी, शांत, गपगप दिसत आहे. त्याची प्रकृती अजिबात चांगली वाटत नाही. सुशांतचे शब्ददेखील अडखळत आहेत. तो ठिक बोलूदेखील शकत नाहीये.

सुशांतच्या फॅन्सनी मागितला न्याय

दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ त्यावेळचा आहे, जेव्हा सुशांत रिया चक्रवर्तीसोबत राहत होता. हा व्हिडिओ रियाने शूट केला आहे, असे नेटिझन्सनी म्हटलं आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर सुशांतचे फॅन्स त्याच्या या परिस्थितीला जबाबदार रिया चक्रवर्तीला ठरवत आहेत. सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. एका युजरने सुशांतची परिस्थिती पाहून रियावर आपला संताप व्यक्त केला आहे. शिवाय आणखी एका युजरने म्हटलं आहे की, रियाला जेलमध्ये टाका. दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की-‘आवाजदेखील निघत नाहीये. माहिती नाही, काय केलं असेल रियाने.’

सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशीपमध्ये होते, हे सर्वश्रृत आहे. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रियाला ठरवलं आहे. सुशांतचे वडील आणि बहिणीने रियावर आरोप करत म्हटले होते की, रियामुळेच सुशांतचा जीव गेलाय. रियावर सुशांतला ड्रग्ज देण्याचे आरोपदेखील लागले होते. सुशांत मर्डर केसमध्ये रियाला तुरुंगातदेखील जावे लागले होते.

Back to top button