Urfi Javed : एक दिवस तालिबानचा खात्मा महिलाच करतील : उर्फी जावेदचे ट्विट

urfi javed
urfi javed

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून भाजप नेत्‍या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्‍यातील वाद विकोपाला गेला आहे.  यामुळे उर्फी चर्चेत असतानाच (Urfi Javed) आता ती आणखी एका ट्विटमुळे चांगलीच चर्चेत आलीय. तिने थेट तालिबानवर बेधडक ट्विट केलं आहे. तालिबानने महिलांविरोधात काढलेल्या फतव्यावर तिने हे ट्विट केले आहे. उर्फीने ट्विट केले आहे की, "एक दिवस महिलाच तालिबानचा अंत करतील." (Urfi Javed)

उर्फी जावेदने  ट्विटमध्ये फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिले आहे की, तालिबानने महिलांना पुरुष डॉक्टरांना भेटण्यासाठी मज्जाव. ब्युटी सलून १० दिवसांसाठी बंद.

Mark my words , one day a women will be the end of taliban ! असे म्हणत उर्फीने फोटो शेअर केला आहे. त्यावर म्हटलं आहे – "तालिबानने पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर उपचार न करण्याचे आदेश दिले आहेत. मग जर महिलांना विद्यापीठात बंदी घातली तर डॉक्टर होण्यासाठी त्यांना अभ्यास करता येणार नाही. आणि पुरुष डॉक्टरांना महिलांवर उपचार देखील करता येणार नसतील, तर महिलांनी काय करावे ? असे सवाल करत एकामागून एक ट्विट तिने केले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news