UPI Transaction : युपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार : एनसीपीआयचा खुलासा

UPI Transaction
UPI Transaction

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : युपीआयच्या माध्यमातून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणाऱ्यांना वाढीव शूल्क आकारले जाणार असल्याच्या निवेदनावर नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशनने खुलासा करीत युपीआयद्वारे केले जाणारे व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहतील, असे स्पष्ट केले आहे. (UPI Transaction)

मर्चंट व्यवहारासाठी प्रि-पेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट्स [पीपीआय] वापरणाऱ्या व्यवहारांवर अतिरिक्त शूल्क लावण्यात आले असून त्याचा भार ग्राहकांवर टाकला जाणार नाही. तसेच सरसकट युपीआय व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शूल्क लादण्यात आलेले नाही, असे एनसीपीआयने स्पष्ट केले आहे. युपीआय व्यवहारांवर कमाल 1.1 टक्के इंटरचार्ज शूल्क लावण्यात आल्याचे अलिकडेच निवेदनाद्वारे सांगण्यात आले होते. बॅंका आणि पेमेंट सवि्र्हस प्रोव्हायडर्सचा महसूल वाढविण्यासाठी हा शूल्क लावण्यात आल्याचे तसेच दर सहा महिन्यांनी शुल्काबाबत आढावा घेतला जाणार असल्याचे त्यात म्हटले होते.

 UPI Transaction : कोणतेही शूल्क नाही

यावर बॅंक खात्यातून बॅंक खात्यात केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शूल्क लावण्यात आलेले नाही, त्यामुळे युपीआय वापरकर्त्यांनी चिंता करु नये, असे एनपीसीआयने म्हटले आहे. दरम्यान पेटीएम पेमेंट्स बॅंकेने देखील युपीआय वापरकर्त्यांसाठी आपली सेवा मोफत राहणार असून वापरकर्त्यांना कोणतेही इंटरचार्ज शूल्क द्यावे लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news