UPI Transaction : मोठी बातमी! वॉलेटद्वारे 2000 रुपयां पेक्षा जास्त रकमेचे UPI व्यवहार होणार सशुल्क? | पुढारी

UPI Transaction : मोठी बातमी! वॉलेटद्वारे 2000 रुपयां पेक्षा जास्त रकमेचे UPI व्यवहार होणार सशुल्क?

पुढारी ऑनलाइन डेस्क : UPI Transaction : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) द्वारे (वॉलेटद्वारे) केलेल्या 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर इंटरचेंज फीची शिफारस केली आहे. NPCI ने 1.1 टक्क्यांपर्यंत अदलाबदल शुल्क प्रस्तावित केले आहे. बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे.

भारत हा त्वरेने डिजिटल पेमेंट सिस्टिमकडे जात आहे. गेल्या काही वर्षात भारतात UPI ही सर्वाधिक पसंतीची आणि सर्वाधिक वापरली जाणारी पेमेंट प्रणाली आहे. फक्त मोबाइल नंबरवरून तुम्ही बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरित करू शकतात. यानंतर PPI हे डिजिटल वॉलेट सिस्टम आहे. याद्वारे देखील वापरकर्ते पैसे साठवण्याची आणि पेमेंट करू शकतात. जसे की PayTm, Phone Pe, Google Pay यांसारखे PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स) आहेत. या वॉलेटमधून UPI चा वापर करून तुम्ही पेमेंटची देवाण-घेवाण करतात. या PPI द्वारे केलेल्या UPI व्यवहारांवर हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव NPCI ने तयार केला आहे.

UPI Transaction : इंटरचेंज शुल्क काय आहे?

हस्तांतरण शुल्क अर्थात इंटरचेंज फी एका बँकेद्वारे दुसर्‍या बँकेकडून व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी आकारली जाते. UPI व्यवहारांच्या बाबतीत, इंटरचेंज फी व्यापाऱ्याच्या बँकेद्वारे (पेमेंट प्राप्त करणारी व्यक्ती किंवा व्यवसायिक) देणाऱ्याच्या बँकेला (पेमेंट करणारी व्यक्ती) दिली जाते.

UPI Transaction : शुल्क कोणाला द्यावे लागणार?

एनपीसीआयकडून प्रस्तावित शुल्काचा फटका पेमेंट देणाऱ्या अर्थात वापारकर्त्याला बसणार नाही. तर हे शुल्क फक्त मोबाइल वॉलेटसारख्या प्रीपेट पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) वापरून 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांना हे लागू होईल. थोडक्यात व्यापाऱ्यांना तर UPI वापरून वैयक्तिक व्यवहार करणाऱ्या वैयक्तिक वापरकर्त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. थोडक्यात तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना UPI द्वारे पैसे पाठवत असाल किंवा स्वीकारत असाल तर त्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क बसणार नाही.

UPI Transaction : निर्णयावर अद्याप आरबीआय कडून शिक्कामोर्तब होणे बाकी

NPCI च्या मते, प्रस्तावित इंटरचेंज फी पेमेंट्स आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि जागतिक बँकेच्या समितीच्या शिफारशींनुसार आहे, जे UPI व्यवहारांसाठी 1.15 टक्क्यांपर्यंत इंटरचेंज फी सुचवते. तथापि, अद्याप निर्णय घेतलेला नाही, तो भारतातील पेमेंट सिस्टमचे नियमन करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) घेईल. NPCI ने आपला प्रस्ताव RBI कडे सादर केला आहे, आणि RBI शिफारस मंजूर करेल की नाही हे पाहणे बाकी आहे.

हे ही वाचा :

Uorfi Javed : ‘नंगे तो सभी है भाई, फरक इतकाच मी ***आणि काही जण विचारांनी’

Land For Job Scam : ‘लॅंड फाॅर जाॅब’ घोटाळा प्रकरणाची सुनावणी मे महिन्यापर्यंत पुढे ढकलली

Back to top button