पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश राज्यातील बहराइचमध्ये प्रवासी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ६ जण जागीच ठार झाले तर १५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज बुधवारी (दि.३०) पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान घडला. बस आणि ट्रकची धडक इतकी भीषण (UP Accident) होती की, यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. १५ जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
माहितीनुसार, लखनऊ इदगाह डेपोची प्रवासी बस लखनौहून (उत्तरप्रदेश) बहराइचला जात होती. दरम्यान घाघरा घाटाजवळ समोरून येणा-या एका ट्रक बरोबर समोरासमोर धडक बसली. यात ६ ठार झाले आहेत. तर १५ जखमी झाले आहेत. जिल्हा दंडाधिकारी दिनेश चंद्र सिंह यांनी सांगितले की, लखनौ डेपोच्या बसला एका वेगवान ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. पहाटे ४.३० वाजता ही घटना घडली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १५ पैकी जे ४ गंभीर जखमी आहेत त्यांना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ट्रकचालक ट्रकसह फरार झाला आहे. ट्रकची ओळख पटवण्यासाठी पोलिस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तर प्राथमिक माहितीनुसार ट्रक चुकीच्या बाजूने जात होता त्यामुळे हा अपघात घडला.
हेही वाचा