Fifa World Cup 2022 : लग्नासाठी साठवलेले पैसे वर्ल्ड कप पाहण्यासाठी खर्च, फुटबॉल वेड्या नवरदेवाची कहाणी | पुढारी

Fifa World Cup 2022 : लग्नासाठी साठवलेले पैसे वर्ल्ड कप पाहण्यासाठी खर्च, फुटबॉल वेड्या नवरदेवाची कहाणी

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : फिफा विश्वचषकाच्या फिव्हरने फुटबॉल चाहत्यांवर स्वार होत आहे, याचे उदाहरण हे चित्र पाहिल्यावर समजू शकते. या चाहत्याने आपल्या लग्नासाठी साठवलेले पैसे केवळ फुटबॉल वर्ल्ड कप पाहण्यासाठी खर्च केले आणि त्यानंतर फलक हातात घेऊन आपल्या होणाऱ्या पत्नीची माफी सुद्धा मागितली. या फोटोद्वारे व्हायरल झालेला चाहता हा मेक्सिकोचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. (Fifa World Cup 2022)

हे अनोख्ये उदाहरण आहे. फूटबॉलसाठी चाहते काय काय करतील हे सांगता येत नाही. आयुष्यात प्रेम, लग्न एकदाचं होत असतं. त्यामुळे जो कोणी आपल्या आयुष्यातील असा एकमेव सोहळा अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या फूटबॉल चाहत्याने यांच्या लग्नाची ही अनोखी गोष्ट सर्वांच्या लक्षात राहिल अशी कृती केली आहे. लग्न करण्यासाठी साठवलेले पैसेच त्याने फूटबॉल वर्ल्डकपवर खर्च केले. कतारला येऊन फूटबॉलच्या सामन्याचा आस्वाद घेत मौजमजा सुद्धा केली. बहाद्दर इथेच न थांबता आपण केलेल्या कृतीची माफी होणाऱ्या पत्नीकडे सामन्यात फलक झळकावून मागितली.

या फूटबॉलच्या निस्सिम चाहत्याने फलकावर लिहिले आहे की, ‘प्रिये, मला माफ कर, लग्नासाठी मी वाचवलेले पैसे कतारला येण्यासाठी खर्च केले’. या चाहत्याच्या संघाबद्दल बोलायचे तर, मेक्सिको विरुद्ध पोलंड हा विश्वचषकातील त्यांचा पहिला बरोबरीत सुटला होता. या सामन्यात कोणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे 0-0 असा सामना बरोबरी सुटला. यानंतर अर्जेंटिनाने दुसऱ्या सामन्यात त्यांचा 2 – 0 असा पराभव केला. आता पुढील सामन्यात मेक्सिकोला सौदी अरेबियाचा सामना करावा लागणार आहे. (Fifa World Cup 2022)

प्रेक्षकांच्या ना..ना तऱ्हा… (Fifa World Cup 2022)

या पठ्ठ्याने जसा फूटबॉल वर्ल्ड कपसाठी लग्नांच्या पैशांवर डल्ला मारला तसाच पण, वेगळा प्रकार क्रोएशियन मॉडेलने केला आहे. क्रोएशियाची इव्हाना नोलनने कतारचे नियम धाब्यावर बसवून सामन्यादरम्यान अत्यंत बोल्ड कपडे परिधान केले होते. तर स्पर्धेचा यजमानान असणाऱ्या कतारने आधीच स्पष्ट केले होते, की कतारच्या लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.

दुसरीकडे, पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील विश्वचषक फुटबॉल सामन्यादरम्यान, एक आंदोलक प्रेक्षकाने रंगीबेरंगी झेंडा घेऊन आणि निळ्या रंगाचा सूपरमॅनचा टी-शर्ट घालून मैदानावर गेला. त्याच्या शर्टवर समोरच्या बाजूला ‘युक्रेन वाचवा’ आणि ‘इराणी महिलांचा आदर करा’ असे लिहले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला पकडून बाहेर नेले.


अधिक वाचा :

Back to top button