तामिळनाडूच्‍या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधींची वर्णी लागणार?

द्रमुकचे नेते आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन.
द्रमुकचे नेते आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांची  उपमुख्यमंत्रीपदी (Deputy Chief Minister) वर्णी लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्‍यनिधी यांचे पिता आणि तामिळनाडूचे मुख्‍यमंत्री एम के स्‍टॅलिन हे पुढील महिन्‍यात विदेश दौर्‍यावर जाणार आहोत. त्‍याच्‍या गैरहजरीत उद्‍यनिधी यांच्‍याकडे सत्तेची सूत्रे असतील,. असे मानले जात आहे.

यासंदर्भात 'इंडिया टूडे'शी बोलताना सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) च्‍या सूत्रांनी सांगितले की, एमके स्टॅलिन फेब्रुवारीमध्ये परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्‍यत आहे. यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या वडिलांच्या उपमुख्यमंत्रीपदाची भूमिका स्वीकारण्याचा मार्ग मोकळा होईल.

21 जानेवारीला सेलममध्ये होणाऱ्या द्रमुक युवा मेळाव्‍यात याची अधिकृत घोषणा होण्‍याची शक्‍यता आहे. DMK संघटन सचिव टीकेएस एलांगोवन यांनी म्‍हटले आहे की, अंतिम निर्णय एमके स्टॅलिन यांच्याकडेच राहतील. त्यात काहीही चुकीचे नाही, कारण ते खूप सक्रिय आहेत. परंतु उद्‍यनिधी उपमुख्यमंत्री होणार की नाही, हे केवळ मुख्यमंत्र्यां एम के स्‍टॅलिनच ठरवतील. दरम्‍यान, उदयनिधी यांनी 'इंडिया टुडे' बोलताना, यासंदर्भातील निर्णय फक्त मुख्यमंत्र्यांनीच घ्यायचा आहे. ही केवळ अफवा आहे", असे स्‍पष्‍ट केले.

Udhayanidhi Stalin : द्रमुकमधील घराणेशाहीचे उत्तर उदाहरण : अण्‍णाद्रमुक

दरम्‍यान, विरोधी पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्‍या (अण्‍णाद्रमुक) सूत्रांनीही उदयनिधी उपमुख्यमंत्री बनणे ही चर्चा केवळ अफवा आहे , असे म्हणून फेटाळली जाऊ शकत नाही कारण ही वस्‍तुस्‍थिती असल्‍याचे म्‍हटले आहे. 2026 मध्ये ते मुख्यमंत्री चेहरा असतील आणि यावरून दिसून येते की द्रमुक हे लोकशाहीच्या नावाखाली 'घराणेशाही'चे उत्तम उदाहरण आहे,' अशी टीका अण्‍णाद्रमुक प्रवक्ते कोवई सथ्यान यांनी केले आहे. वडील, मुलगा, नातू हेच पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, हे द्रमुकनेच दाखवले. या पक्षात लोकशाही नाही. मात्र अण्‍णाद्रमीक पक्षात तळागाळातील कार्यकर्ता देखील पक्षाचा प्रमुख होऊ शकतो, असा दावाही त्‍यांनी केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news