Turkey earthquake Photos : येथे एक शहर होतं…भूकंपानंतरची तुर्कस्थानमधील भीषणता समोर (Photo)

Turkey earthquake Photos : येथे एक शहर होतं…भूकंपानंतरची तुर्कस्थानमधील भीषणता समोर (Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कस्तानमधील महाविनाशकारी भुकंपाने अख्ख जग हादरुन गेलं आहे. दिवसेंदिवस मृतांची आणि जखमींची संख्या वाढतचं आहे. या भूकंपाने तुर्कस्तानसह सीरिया आणि इतर देश हादरुन गेले आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. सोमवारी(दि.६) झालेल्या भूकंपाने कोसळलेल्या इमारती, मृत लोक, जखमी लोक, आपत्कालीन वाहने आणि तंबू आश्रयस्थान असं काहीसं  विदारक स्थितीचे सॅटेलाईट द्वारे छायाचित्रे घेण्यात आली आहेत. या फोटोतून स्पष्ट होते की हा भूकंप किती विनाशकारी आहे.  (Turkey earthquake Photos)

Turkey earthquake Photos : तुर्कस्तान भूकंपापूर्वी आणि नंतर 

तुर्कस्तानच्या इतिहासातल्या दुसऱ्या महाविनाशकारी भूकंपाने जग हादरलं आहे. काल (सोमवारी) पहाटे ४ च्या सुमारास तुर्कस्तान आणि सीरियासह आसपासचे देश भूकंपामुळे हादरले. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती. या भूकंपात आतापर्यंत ८,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. (संख्या दि.८ सकाळी १० पर्यंत) याआधी १९३९  भूकंप झाला होता. या भूकंपात  ३२,००० लोक मृत झाले होते. पाहा भूकंपापूर्वीचे आणि नंतरची सॅटेलाईट छायाचित्र. 

मॅक्सर टेक्नॉलॉजीजने हे टिपलेल छायाचित्र. हे  इस्लाहिये (Islahiye) आणि नुरदगी (Nurdagi) शहराचे आहे.  इस्लाहिये शहरातील डझनभर इमारती भूकंपाने कोसळल्या आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या मशिदीच्या पश्चिमेस असलेला निवासी इमारतीं सपाट झालेल्या दिसत आहेत.

इस्लाहिये (Islahiye) भूकंपापूर्वी
इस्लाहिये (Islahiye) भूकंपापूर्वी
इस्लाहिये (Islahiye) भूकंपानंतर
इस्लाहिये (Islahiye) भूकंपानंतर

इस्लाहिये (Islahiye) आणि नुरदगी (Nurdagi) शहरातील जमीनदोस्त झालेल्या इमारती.

नुरदगी शहर भूकंपापूर्वी
नुरदगी शहर भूकंपापूर्वी

नुरदगी शहरात चार ते सहा मजली उंचीच्या त्या दोन इमारतींचा कचरा रस्त्यावर साचला दिसतं आहे. इमारतीजवळमदत कार्य सुरु आहे.

नुरदगी शहर भूकंपानंतर मदत कार्य सुरु आहे.
नुरदगी शहर भूकंपानंतर मदत कार्य सुरु आहे.

तुर्कस्तानमधील एका मोठ्या बागेतील हे छायाचित्र आहे. बेंच, दुकाने असलेली हिरवीगार बाग आता तंबूंनी भरलेली आहे. येथे भूकंपातील वाचलेल्यांना आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांना आश्रय देण्यात आला आहे.

तुर्कस्तानमधील एक हिरवीगार बाग
तुर्कस्तानमधील एक हिरवीगार बाग

हिरवीगार बागेत भूकंपग्रस्तांना आश्रय देण्यासाठी केलेले तंबू (Turkestan earthquake Photos)

तुर्कस्तानमधील या हिरवीगार बागेत भूकंपग्रस्तांना आश्रय देण्यासाठी केलेले तंबू
तुर्कस्तानमधील या हिरवीगार बागेत भूकंपग्रस्तांना आश्रय देण्यासाठी केलेले तंबू

तुर्कस्तानातील काही शहरात इमारती कोसळून विदारक दृश्य निर्माण झाले आहे.

भूकंपापूर्वी
भूकंपापूर्वी
भूकंपानंतरची स्थिती
भूकंपानंतरची स्थिती

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news