Turkey Earthquake: भूकंपानंतर तुर्कस्तानात युद्ध पातळीवर मदतकार्य | पुढारी

Turkey Earthquake: भूकंपानंतर तुर्कस्तानात युद्ध पातळीवर मदतकार्य

पुढारी ऑनलाईन: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपात आतापर्यंत किमान ५२१ हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत.  या  तुर्कस्तानसह सीरिया, लेबनॉन, इस्रायल या शेजारील देशांनाही  जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. यानंतर मोठ्या वेगानेमदत कार्य सुरू आहे.  त्यामुळे तुर्कस्थानसह सीरियातही मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची  शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली जात आहे. गेल्या 100 वर्षांत तुर्कस्थानात झालेल्या भूकंपापैकी हा भूकंप सर्वात शक्तिशाली असल्याचे नोंदवले गेले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या गाझियानटेप शहराजवळ

सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर इतक्या तिव्रतेचा भूकंप झाल. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या गाझियानटेप शहराजवळ होता. त्यानंतर काही तासांत अनेक शेजारील देशांना आणि परिसराला या तिव्र भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. तुर्कितील या भूकंपाचे धक्के तुर्की, सीरिया, लेबनॉन, सायप्रस आणि इस्रायलमधील लाखो लोकांना जाणवले असून यामधील तुर्कस्थान आणि सीरियात मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली आहे.

मृतांच्‍या संख्‍येत वाढ होण्‍याची भीती

सीरियाच्या सीमेजवळ दक्षिण-पूर्व तुर्कस्तानला झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने शेकडो लोक मरण पावले तर शेकडो लोक जखमी झाले. तुर्की आणि सीरियामधील अधिका-यांच्या सुरुवातीच्या विधानांनुसार आत्तापर्यंतची मृतांची संख्या 300 हून अधिक आहे, तर या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता येथील यंत्रणेने दर्शवली आहे.

तीव्र भूकंपानंतर तुर्कीने आणीबाणीची घोषित केली आहे. बचावकर्त्यांना सहकार्य करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी लोकांना मोबाइल फोन वापरू नका असे आवाहन येथील सरकारकडून केले जात आहे. दोन्ही देशांमध्ये शेकडो इमारती कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती सूत्रांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शोध आणि बचाव कार्य मदत मागितली आहे. यानंतर अमेरिका, इस्रायल आणि भारताने मदतीचे आवाहन केले आहे.

 

Back to top button