Tunisha Sharma Death : ‘तुनिषा होती गर्भवती; शीझान खानने लग्नाला दिला नकार’, मैत्रिण तनेजाचा दावा

Tunisha Sharma
Tunisha Sharma

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma Death ) मृत्यू प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'मैत्रिण' आणि 'मॅडम सर' फेम प्रीती तनेजाने तुनिषा गर्भवती होती आणि बॉयफ्रेंड शीझानने लग्नाला नकार दिल्याने ही घटना घडली, असा दावा केला आहे.

'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवरील मेकअपरुममध्ये अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma Death ) हिने स्वत:चे जीवन संपवले. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तुनिषाचा बॉयफ्रेंड शीझानविरोधात तक्रार केली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी शीझानवर मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली. शीझान खानला न्यायालयात हजर केले असता त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हे सर्व घडत असताना आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तुनिषाची मैत्रिण प्रीती तनेजाने ती गर्भवती होती. पण बॉयफ्रेंड शीझान खानने तिला लग्नासाठी नकार दिल्यानेच तिने हे पाऊल उचलले, असा दावा प्रीती तनेजाने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा आणि बॉयफ्रेंड शीझान यांच्यात एक आठवड्यापूर्वी भांडण झाले होते. याबाबत शीझानकडे विचारणा केली असता तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news