Tunisha Sharma Death Case: शिझान खानचा जामिनासाठी अर्ज

sheezan khan
sheezan khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या शीझान खानने जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. (Sheezan Khan) शीझान खानला कोर्टाने १४ दिवसांची नयायालयीन कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत तुनिषा शर्मा केसमध्ये अनेक नवनवे खुलासे होत आहेत. हे देखील वृत्त समोर आले आहे की, शीझान तुनिषाला मारहाण देखील करायचा. (Sheezan Khan)

आता शीझानच्या कुटुंबीयांनी जामिनासाठी अर्ज केल्याचे वृत्त समोर आले आहे. रिपोर्टनुसार, पोलिस चौकशीदरम्यान, शीझान आपला ईमेल आयडी आणि अन्य पासवर्ड सांगत नसल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, अशीही माहिती समोर आलीय की, शीझान तुनिषाला उर्दू शिकवत होता आणि तिला सेटवर थप्पड मारली होती.

शीझानचे वकील काय म्हणाले?

शीझानचे वकील म्हणाले, जेव्हा मोबाईल जप्त केला आहे तर कस्टडीची काय गरज आहे. मागील ७ दिवसांपासून शीझान कस्टडीमध्ये होता. शीझानचे वकील शरद राय यांनी कोर्टात जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आज ते रिमांडचा विरोध करतील आणि न्यायालयीन कोठडी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यानुसार, वसई कोर्टाने शीझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत २७ लोकांचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शीझान तपासात कुठलेही सहकार्य करत नाही. चॅट्सवरून सातत्याने चौकशी होत आहे. परंतु, तो वारंवार आपला जबाब बदलत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news