आमदार बबनराव पाचपुते यांचे राजकारण संपविण्याचा घाट ; सरपंच साजन पाचपुतेंची टीका | पुढारी

आमदार बबनराव पाचपुते यांचे राजकारण संपविण्याचा घाट ; सरपंच साजन पाचपुतेंची टीका

काष्टी :  पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांचे राजकारण संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. काष्टीच्या उपसरपंच निवडीनंतर आ. पाचपुते गटाच्या दहा सदस्यांच्या राजीनामा नाट्यावर आ.पाचपुते यांचे पुतणे व काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी पत्रकालांशी बोलताना खंत व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह यांचा पुतण्या साजन यांनी पराभव केला. त्यांनंतर सुद्धा आ. पाचपुते गटाला ग्रामपंचायत मध्ये दहा सदस्यांचे बहुमत असताना उपसरपंच निवडीत त्यांच्या गटाचे एक मत फुटल्याने झालेला पराभव जिव्हारी लागून त्यांच्या गटाच्या दहा सदस्यांनी तडका फडकी राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांच्याकडे दिले.

याबाबत पत्रकारांशी बोलताना सरपंच साजन पाचपुते म्हणाले, राजीनामे देण्याआगोदर दहा सदस्यांनी जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता आ. पाचपुते यांच्या दुसर्‍या फळीतील घातकी कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेतला. यातून त्यांना विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटत असल्याचे सिद्ध होते. या राजीनामा नाट्ट्यामागे माजी मंत्री आ. पाचपुते यांचा अथवा त्यांच्या घरातील कोणाचा काहीच संबंध नाही. आ.पाचपुते यांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांच्याच जवळच्या लोकांनी या दहा सदस्यांना राजीनाम्याचे पाऊल उचलायला भाग पाडले आहे.

मला फक्त राजकारण करून विरोधाला विरोध करावयाचा नसून, मी जनतेतून निवडून आलो आहे. मला गावाचा विकास करायचा आहे. पण त्यांना विकास नको, तर फक्त सत्ता हवी आहे. राजीनामे देऊन सहनभूती मिळणार नाही . जर राजीनामे द्यायचे असतील, तर मला त्यातील निम्म्या लोकांनी राजीनामा स्वीकारू नये, या साठी दुसर्‍या दिवसापासून फोन सुरू झाले आहेत ते कशासाठी?. जर राजीनामे द्यायचे असेल तर त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगावे, मी त्यांचे राजीनामे लगेच मंजूर करतो. राजीनाम्याचा देखावा कश्यासाठी? दोन दिवसांत माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन यावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे साजन पाचपुते यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच राहुल टिमुणे यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.

परिस्थिती पाहून उमेदवार ठरविणार

आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी या सारख्या निवडणुकांत परिस्थिती पाहून निवडणुका लढविणार असल्याचे सांगत समोरचा उमेदवार पाहून मी माझा उमेदवार ठरविणार असल्याचे सरपंच साजन पाचपुते यांनी सांगितले.

विरोधाला विरोध करणार नाही

ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरवत गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणून गावाचा विकास केला जाईल. जो पक्ष मला गावच्या विकासाला निधी देईल, त्यांच्याबरोबर आम्ही राहणार असल्याचे सांगत पुढील राजकारणात फक्त विरोधाला विरोध म्हणून काम करणार नसल्याचे सरपंच पाचपुते यांनी सांगितले. फ

Back to top button