“तू चीज बडी है मस्क मस्क”; ब्लू टिक परत मिळताच अमिताभ बच्चन यांनी मानले एलॉन मस्क यांचे आभार

“तू चीज बडी है मस्क मस्क”; ब्लू टिक परत मिळताच अमिताभ बच्चन यांनी मानले एलॉन मस्क यांचे आभार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरला पुन्हा ब्लू टिक मिळाली आहे. ट्विटरने ब्लू टिक परत केल्यानंतर अमिताभ यांनी एलॉन मस्क यांचे आभार मानले. शुक्रवारी (दि. २१) अनेक ट्विटरची व्हेरिफाईड ब्लू टिक्स हटविण्यात आली होती.

ट्विटरवरून काढलेल्या ब्लू टिकच्या यादीत बॉलिवू़ड अभिनेते शाहरूख खान, सलमान खान, रजनीकांत यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अकाऊंटचाही समावेश आहे. यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवर खास शैलीत ब्लू टिक परत देण्याबद्दल विनंती केली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले की, "ए ट्विटर भैया! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्हीही पैसे भरले आहेत… आमच्या नावापुढे ते निळे कमळ लावा भाऊ, जेणेकरून लोकांना कळेल की आम्ही अमिताभ बच्चन आहोत.. आम्ही हात जोडले आहेत, आता काय पाया पडू का?"

अमिताभ यांच्या या ट्विटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने लिहिले, हे तुमचे खाते आहे की कोणीतरी फिरकी घेत आहे. तर दुसर्‍याने लिहिले, आता तुम्हालाही रांगेत उभे राहून वाट पहावी लागेल. पूर्वी तुम्ही जिथे उभे राहायचे तिथून लाईन सुरू व्हायची.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news