कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : शिवणकाम करणार्‍या महिलेला भाजपची उमेदवारी | पुढारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : शिवणकाम करणार्‍या महिलेला भाजपची उमेदवारी

मंगळूर : निवडणुकीच्या रिंगणात बड्या हस्ती जिंकण्यासाठी कसरत करत असताना भाजपने एका सामान्य महिलेला उमेदवारी दिली आहे. मंगळूर जिल्ह्यातील सुळ्या विधानसभा मतदारसंघातून शिवणकाम करत पशुसंगोपन करून उपजीविका करणार्‍या भागीरथी मुरुळ्य यांना उमेदवारी दिली आहे.

35 वर्षांनंतर याठिकाणी नवीन उमेदवार पक्षाने दिला आहे. हा मतदारसंघ राखीव आहे. तेथून त्या नशीब आजमावणार आहेत. त्यांचा जन्म सुळ्या तालुक्यातील मुरुळ्य गावातील गुरुव आणि कोरगू या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले असून त्यांनी चार वर्षे प्राथमिक शाळेत अतिथी शिक्षिका म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्या दुग्ध व्यवसाय करत असून चार जनावरे आहेत. त्याचबरोबर फावल्या वेळेत आजूबाजूच्या लोकांचे कपडे शिवतात. त्या राष्ट्र सेविका समितीमध्ये कार्यरत आहेत. तेथील प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले आहे. यापूर्वी त्यांनी 2000 मध्ये येण्णुरू ता. पं. मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली होती. जिल्हा पंचायतीमध्येही त्यांनी यश मिळविले. त्याचबरोबर त्या अनेक सहकारी संस्थांमध्ये कार्यरत आहे. त्या अविवाहित असून त्यांना दोन भाऊ आहेत. घरची जबाबदारी पार पाडत त्या समाजकारण करत असतात. त्याची दखल घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Back to top button