Mamata Banerjee : आम्हाला पश्‍चिम बंगालमध्ये शांतता हवी आहे : ममता बॅनर्जी | पुढारी

Mamata Banerjee : आम्हाला पश्‍चिम बंगालमध्ये शांतता हवी आहे : ममता बॅनर्जी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काहींना देशात फूट पाडायची आहे. आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत.  आम्हाला देशात फूट नको आहे. मी माझा जीव द्यायला तयार आहे; पण मी देशाचे विभाजन होऊ देणार नाही, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे बोलताना केले.

Mamata Banerjee : अजुन एक वर्ष बाकी आहे…

रमजान ईद निमित्त माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला तुम्हाला एवढेच सांगायच आहे की, शांत राहा, कोणाचेही ऐकू नका. कोणी भाजप कडून पैसे घेतो आणि विशिष्‍ट मतांमध्ये फूट पाडू असे म्हणतो. पण भाजपसाठी मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे धाडस त्यांच्यात नाही आहे. लोकसभा निवडणुकीला अजूनही एक वर्ष बाकी आहे. कोण निवडून येईल आणि कोण नाही ते पाहा. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे. लोकशाही गेली तर सर्व काही निघून जाईल, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

 

हेही वाचा 

Back to top button