नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे

नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांची 2016-17 या काळातील किमान वेतनाची थकबाकी संबंधित ठेकेदाराकडून येणे आहे. यासंदर्भात आयुक्तांनी वारंवार आश्वासन देऊनही त्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी (दि.31) महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. घंटागाडी कामगारांनी किमान वेतन मागितले म्हणून संबंधितांना काम नाकारण्यात आले होते. कामगारांसंदर्भात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन संबंधित विभागीय अधिकार्‍यांच्या चौकशीचे पत्र दिले. परंतु, अद्याप त्यावर कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. 21 दिवसांच्या भरपगारी रजेच्या थकीत वेतनाबाबत पुढे कार्यवाही नाही. या व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत 31 मार्चला मनपासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती नाशिक महापालिका श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी दिली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news