पन्हाळा : बाघबीळ तिठ्यावर पाण्याचा टँकर दरीत घसरला; 'ते' झाड नसते तर... | पुढारी

पन्हाळा : बाघबीळ तिठ्यावर पाण्याचा टँकर दरीत घसरला; 'ते' झाड नसते तर...

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा येथील एका निवासी शाळेला पिण्याचे पाणी पुरवठा करणारा टँकर रिव्हर्स मध्ये गेल्याने वाघबिळ तिठ्याच्या दरीत घसरला. यावेळी चालक टँकर मध्ये नसल्याने तो बचावला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

याबाबत प्रत्येक्षदर्शींनी सांगितलेली माहिती अशी की, पन्हाळा येथील एका निवासी शाळेला टँकरच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरवले जाते. आज (शुक्रवार) सकाळी देखील पाणी घेऊन टँकर वाघबिळ येथे आला असताना टँकर चालक रस्‍त्‍याच्या चढतीला टँकर उभा करून चहा पिण्यासाठी उतरला. तेव्हा काही वेळात अचानक टँकर हळूहळू मागे सरकण्यास सुरवात झाली. लोकांच्या लक्षात येताच तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा करत रस्त्यावरील वाहने, थांबलेल्या दुचाकी बाजूला केल्या. यावेळी आजुबाजूचे लोक सुरक्षीत अंतरावर उभे राहिले.

हा टँकर पाणी भरलेला असल्याने रस्‍त्‍याच्या उतारावर टँकरचा वेग वाढला आणि वाघबीळ थांब्याच्या दरीत गेला. सुदैवाने मागे एक झाड असल्याने टँकर झाडाला धडकून अडकला. अन्यथा टँकरचे देखील मोठे नुकसान झाले असते. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळेच टँकर दरीत घसरला. टँकर रस्‍त्‍याच्या उतारावर लावून चालक उतरला असल्याने हा अपघात झाला. टँकर चालकाचे नाव समजू शकले नाही.

हेही वाचा :     

Back to top button