Anjali Arora : अंजलीच्या mms नंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल

anjali arora
anjali arora
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टिकटॉक स्टार अंजली अरोरा (Anjali Arora) लॉकअप शो आणि कच्च्या बदामाच्या गाण्यामुळे चर्चेत आली होती. अलीकडे सोशल मीडियावर अंजली अरोराबाबत सतत चर्चा रंगत होती. वास्तविक, अंजलीचा एक एमएमएस व्हायरल झाला होता, ज्याची चर्चा रंगली होती. एमएमएसबद्दल लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, एमएमएसमध्ये दिसणारी मुलगी अंजली नसल्याचे नंतर उघड झाले. हा एमएमएस लीक झाल्यानंतर अंजलीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Anjali Arora)

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अंजली 'तेरा नशा'वर डान्स करत आहे. ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये अंजली खूपच सुंदर दिसत आहे. अंजली अप्रतिम डान्स मुव्ह्ज आणि कमालीचे एक्सप्रेशन्स देत आहे. यामध्ये ती खूप बोल्ड दिसतेय. या व्हिडिओवर आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. तिचे फॅन्स हार्ट इमोजी शेअर करत कमेंट करत आहेत.

'सैयां दिल में आना रे' गाण्यावर शानदार डान्स

अंजलीने याआधी आणखी एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. जे पाहता-पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये अंजलीने एक डीप नेक काले रंगचा क्रॉप टॉप घातला होता आणि सोबतच रिप्ड जीन्स घातली होती. या व्हिडिओमध्ये अंजलीने 'सैयां दिल में आना रे' गाण्यावर डान्स केला होता. फॅन्सनादेखील अंजलीचे मुव्ह्ज खूप आवडले होते.

लीक व्हिडिओ बनावट

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ, एक एमएमएस (MMS) सोशल मीडियावर व्हायरल होत होता. लोकांचा दावा होता की, त्या एमएमएसमध्ये जी तरुणी आहे, ती अभिनेत्री अंजली अरोरा आहे. अंजलीने या व्हिडिओवर मौन सोडत म्हटले की, व्हिडिओमध्ये ती नाही तर तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी आहे. अंजली म्हणाली की, 'हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे. तिला बदनाम करण्यासाठी तिचे नाव घेतले जात आहे. तिने हे देखील सांगितलं की, हा व्हिडिओ माझे कुटुंबीयदेखील पाहत आहे. मी केवळ २३ वर्षांची आहे, हे सर्व मी पेलू शकत नाही.'

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news