Tanushree Dutta : तनुश्री दत्ता बॉडीशेमिंगवरून ट्रोल, वाढलेले वजन आणि…

tanushree dutta
tanushree dutta
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत इंटीमेट सीन देऊन चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावर नेहमीच असते. MeToo चळवळीमुळे चर्चेत असलेली तनुश्री बॉलीवूड आणि त्यातील कलाकारांना लक्ष्य करत असते. दरम्यान, आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील अभिनेत्रीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. एवढेच नाही तर तिचा हा लूक पाहून तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. (Tanushree Dutta)

लाईमलाइटपासून दूर, तनुश्री नुकतीच एका कार्यक्रमात बऱ्याच दिवसांनी दिसली. या कार्यक्रमातील अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बर्‍याच दिवसांनंतर ती दिसल्याने तिचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. तर काही जण तिला जोरदार ट्रोल करत आहेत. वास्तविक म्हणजे, या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अभिनेत्रीचे वजन खूप वाढलेले दिसते. अशा स्थितीत वाढलेल्या वजनामुळे तिला एज शेमिंगला बळी पडावे लागले.

एका युजरने कमेंट करत 'काय होतीस तू काय झालीस' असे लिहिले. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, तुमची चरबी वाढली आहे. एका युजरने कमेंट करत विचारले की, तुम्ही इतके शांत का आहात? आणखी एकाने तिला सल्ला दिला की, आता तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे. मात्र, तिला पाहून आनंद व्यक्त करताना एका युजरने लिहिले की, 'तू अजूनही तितकीच सुंदर आहेस'.

समोर आलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसली. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्री अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news