Akshaya Deodhar : आस लागली दर्शनाची, गणेशोत्सवाला अक्षयाचा साजशृंगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रिन एकत्र दिसलेल्या जोडीला आता प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. दरम्यान, अक्षया आणि हार्दिक दोघेही (akshaya deodhar) लग्नाआधी भटकंती करत आहेत. नुकताच ते दापोलीला जाऊन आले आहेत. तेथील समुद्र किनाऱ्याचा व्हिडिओदेखील त्यांनी शेअर केला होता. आता गणेशोत्सव एका दिवसावर आहे. दरम्यान, अक्षया देवधरने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही फोटो शेअर केले आहेत. तसेच व्हिडिओदेखील शेअर केला आहे. (akshaya deodhar)
अक्षयाने आपल्या गणेश उत्सवाचे फोटो शेअर करत असताना ” आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची….” अशी कॅप्शन लिहिली आहे. तर आणखी काही फोटोंना तिने मोरया अशी कॅप्शन लिहिलीय. अक्षया एका मोठ्या गणपतीच्या प्रतिमेसमोर उभी आहे. दुसऱ्या एका फोटोत ती पाठमोरी बसलेली दिसते. दुसऱ्या एका फोटोत तिचा शाडो फोटो आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्येही ती सुंदर दिसते. व्हाईट साडी, लाल रंगाचे ब्लाऊज, केसात गजरा, नाकात नथ असा शृंगार तिने केलेला दिसतो. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये coming soon असे लिहिलेले दिसते.
दरम्यान, अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे हे लवकरच लग्न करणार आहेत. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दोघांनी पती -पत्नीची भूमिका साकारली होती. आता रिअल लाईफमध्येही दोघे एकमेकांचे साथीदार होणार आहेत.
- Gauri Kulkarni : चाफा बोले ना ……❤️❤️
- नेटफ्लिक्सकडून पाच चित्रपटांची घोषणा
- मीम्स बघण्यात भारतीयांचा जातो दिवसातील ‘इतका’ वेळ
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram