IND vs NED : नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल शक्य

IND vs NED : नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल शक्य
Published on
Updated on

बंगळूर; वृत्तसंस्था : आयसीसी विश्वचषक 2023 मधील शेवटचा साखळी सामना उद्या (रविवारी) भारत आणि नेदरलँड यांच्यात होणार आहे. हा सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देऊन त्यांच्या जागी अनुक्रमे प्रसिद्ध कृष्णा, इशान किशन आणि रविचंद्रन अश्विन यांना संघात संधी मिळू शकते. (IND vs NED)

भारताने याआधीच गुणतालिकेत अव्वल स्थानासह उपांत्य फेरी निश्चित केली आहे. अशा स्थितीत नेदरलँडस्विरुद्धच्या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा भारताच्या गुणतालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. पण या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यातून तीन स्टार खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. भारतासाठी उद्याचा हा सामना ही केवळ औपचारिकता आहे.

भारत नेदरलँडविरूद्धच्या सामन्यानंतर उपांत्य फेरीत खेळणार आहे. या सामन्यात सर्व खेळाडूंनी तंदुरुस्त राहणे अत्यंत गरजेचे आहे. पण जर कोणास दुखापत झाली तर रोहित शर्माला त्याचा बॅकअप घ्यावा लागेल. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वप्रथम उत्कृष्ट फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. फिरकी आणि फलंदाजीची जादू असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते. तिसरा बदल असेल तो म्हणजे उपकर्णधार के.एल. राहुलच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत त्यांना विश्रांती देऊन दुखापतीपासून त्यांना वाचवणे हे त्यांना वगळण्याचे मुख्य कारण आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news