Champions Trophy 2023 : इंग्लंडचे ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चे तिकीट झालं ‘कन्‍फर्म’! | पुढारी

Champions Trophy 2023 : इंग्लंडचे 'चॅम्पियन्स ट्रॉफी'चे तिकीट झालं 'कन्‍फर्म'!

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय ( वनडे) विश्‍वचषक स्‍पर्धेतील गतविजेता इंग्लंड संघाची यंदाच्‍या स्‍पर्धेतील कामगिरी अत्‍यंत सुमार झाली. त्यांनी या स्पर्धेमध्ये 9 सामन्यांत 3 विजय मिळवले. तर 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागेले. या स्पर्धेतील सुमार कामिगिरीमुळे २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड पात्र ठरणार नाही नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. मात्र पाकिस्तानविरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातील विजयामुळे इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपले तिकीट कन्फर्म केले आहे. (Champions Trophy 2023)

काय आहे चॅम्‍पियन्‍स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्‍याचा नियम

आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेतील पहिले आठ संघच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील, असा नियम आयसीसीनं जाहीर केला आहे. यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांनी आधीच पात्रता मिळवली आहे. यांच्या गुणतालिकेत सातव्या आणि आठव्या स्थानी असलेले संघ ही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. म्हणजेच आता इंग्लंड आणि बांगलादेश खेळताना आपल्याला पहायला मिळणार आहेत. (Champions Trophy 2023)

यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत इंग्‍लंड संघाची निराशाजनक कामगिरी

२०१९मध्‍ये विश्‍वचषक स्‍पर्धेतील विजेता इंग्‍लंड संघाची यंदाच्‍या स्‍पर्धेतील कामगिरी निराशाजनक झाली. सुरुवातीपासून संघातील खेळाडू आपल्‍या नावाजा साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. या स्‍पर्धेत इंग्‍लंडने दुसर्‍या सामन्‍यात विजय मिळवला होता. मात्र यानंतरच्‍या पाच सामन्‍यांमध्‍ये या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. गुणतालिकेत इंग्‍लंड रसातळाला गेला. त्‍यामुळे इंग्‍लंड संघ चॅम्‍पियन्‍स ट्रॉफीला मुकणार अशी चर्चा रंगू लागली होती.

अखेरच्‍या सामन्‍यांमध्‍ये इंग्‍लंडचा संघाने लय पकडली. या स्‍पर्धेत इंग्‍लंडने बांगलादेश आणि त्‍यानंतर नेदरलँडचा पराभव करत चार गुण मिळवत गुणतालिकेत सातव्‍यास्‍थानी आले. याचेळी आज ऑस्‍ट्रेलियाने आज बांगलादेशचा पराभव केला त्‍यामुळे बांगलादेश आठव्‍याच स्‍थानी राहिले. तर श्रीलंका आणि नेदरलँड अनुक्रमे नवव्‍या व दहाव्‍या स्‍थानी राहिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button