AUS vs BAN : मार्शची झंझावती १७७ धावांची खेळी, ऑस्‍ट्रेलियाचा बांगला देशवर ८ गडी राखून दणदणीत विजय | पुढारी

AUS vs BAN : मार्शची झंझावती १७७ धावांची खेळी, ऑस्‍ट्रेलियाचा बांगला देशवर ८ गडी राखून दणदणीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिचेल मार्शची झंझावती १७५ धावांची खेळी. त्‍याला डेव्हिड वॉर्नर आणि स्‍टीव्‍हन स्‍मिथ यांच्‍या अर्धशतकी खेळीची साथ या  जोरावर ऑस्‍ट्रेलियाने आज (दि.११)  बांगला देशवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ऑस्‍ट्रेलियाने यापूर्वीच एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

मिचेल मार्श- डेव्हिड वॉर्नर यांची शतकी भागीदारी

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३०६ धावा केल्‍या. ३०७ धावांच्‍या आव्‍हानाचा पाढलाग करताना तिसऱ्या षटकातच १२ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. ट्रॅव्हिस हेड 10 धावा करून बाद झाला. त्याला तस्किन अहमदने त्रिफळाचीत (बोल्ड) केले. यानंतर मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्‍ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांमधील शतकी भागीदारी झाली. दोघांनीही आपापली अर्धशतकी खेळी केली. यानंतर २३ व्‍या षटकामध्‍ये मुस्‍तफिझूरने वॉर्नरला शांतोकरवी झेलबाद केले. वॉर्नरने ६१ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार फटकावत ५३ धावांची खेळी केली.

मिचेल मार्शची झंझावती १७७ धावांची खेळी

307 धावांच्‍या आव्‍हानाचा पाढलाग करताना मिचेल मार्शने ८७ चेंडूत शतक झळकावले. यानंतर मार्शने फलंदाजी आणखी बहरली. त्‍याने १३२चेडूत १७७ धावा केल्‍या. आपल्‍या खेळीत त्‍याने  १७  चाैकार आणि ९ षटकारांची आतषबाजी केली. मार्शला स्‍टीव्‍हन स्‍मिथ याची भक्‍कम साथ मिळाली. त्‍याने ५५ चेंडूत  तीन चाैकार आणि एक षटकार फटकावतअर्धशतक ठाेकले. या दाेघांची १७५ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. ऑस्‍ट्रेलियाने बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

बांगला देशचे ऑस्‍ट्रेलियाला ३०७ धावांचे लक्ष्‍य

तत्‍पूर्वी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगला देशच्या सलामीवीर लिटन दास आणि तनजीद हसन यांनी सावध सुरूवात केली. १२ व्या षटकापर्यंत त्यांनी ७६ धावांची भागीदारी केली.  मात्र १२ व्या षटकात ॲबॉटने त्याच्याच चेंडूवर हसनचा झेल टिपला. त्याने ३४ चेंडूत ३६ धावा केल्‍या. यानंतर १०६ धावांवर बांगलादेशला दुसरा धक्का बसला. ॲडम झाम्पा याने लिटन दासला बाद केले. त्याने ४५ चेंडूत ३६ धावा केल्या.
कर्णधार नजमुल हुसेन शांतो ५७ चेंडूत ४५ धावा करून धावचीत झाला. यानंतर ३६ व्या षटकाच्या महमुदुल्लाही धावचीत झाला. त्याने २८ चेंडूत ३२ धावा केल्या. ४३ व्‍या षटकांमध्‍ये  झाम्‍पाने बांगला देशला पाचवा झटका दिला. झाम्‍पाने मुशफिकरला कमिन्‍सकरवी झेलबाद केले. त्‍याने २१ चेंडूत एका षटकाराच्‍या मदतीने २४ धावांची खेळी केली. मुशफिकुर रहीम याला झाम्पा याने पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. मेहदी हसन मिराजने २९ धावा आणि नसुम अहमदने ७ धावा केल्या. महेदी हसन दोन धावांवर तर तस्किन अहमद शून्यावर नाबाद राहिला.

हेही वाचा :

Back to top button