‘राजद’ नेत्‍याची जीभ घसरली, “बॉब कट आणि लिपस्टिक लावणाऱ्या महिला आरक्षणाच्‍या नावाखाली…”

‘राजद’ नेत्‍याची जीभ घसरली, “बॉब कट आणि लिपस्टिक लावणाऱ्या महिला आरक्षणाच्‍या नावाखाली…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेत महिला आरक्षण विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे. देशभरात या विधेयकाचे स्‍वागत होत असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते ( RJD leader) अब्दुल बारी सिद्दीकी  (Abdul Bari Siddiqui ) यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

अब्दुल बारी सिद्दीकी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे 'जागरूकता परिषदे'ला संबोधित करताना म्‍हणाले की, 'महिला आरक्षणात मागासवर्गीय आणि इतरांचाही कोटा निश्चित केला तर बरे होईल, अन्यथा महिलेच्या नावाने पावडर, लिपस्टिक, बॉब कापणाऱ्या महिला नोकरीत येतील का? बरोबर?'

महिलांना आरक्षण हे जातीच्या आधारावर आणि मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्यांच्या आधारावर दिले पाहिजे. लोकसभा निवडणुकीपर्यंत टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित लोकांना केले.

राजदने केले सिद्दीकीच्‍या विधानांचे समर्थन

सिद्दीकी यांच्या 'बॉबकॅट-लिपस्टिक' विधानाचे राजद आरजेडीनेही पाठिंबा दिला आहे. पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, सिद्दीकी हे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले आहेत. त्यांनी आपला मुद्दा उपस्‍थितांना लक्षात यावे म्‍हणून एक उदाहरण दिले आहे. तर राजदचा मित्रपक्ष जेडीयूचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन म्हणाले की, 'आम्ही महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने बिनशर्त मतदान केले आहे. महिला आरक्षणाचे बिहार मॉडेल सर्वोत्तम आहे. असे आमचे मत आहे… केंद्राने महिला आरक्षण विधेयकात दुरुस्‍ती करावी.

भाजप नेत्‍यांचा सिद्दीकींवर हल्‍लाबोल

सिद्दीकी यांच्‍याविरोधात न्‍यायालयात खटला भरण्‍याचा इशारा बिहारमधील भाजप आमदार जनक सिंह यांनी दिला आहे. तर आमदार श्रेयसी सिंह म्हणाले की, 'सिद्दीकींसारख्‍या लोकांना महिलांची प्रगती बघवत नाही. म्हणून खालच्या पातळीवरचे राजकारण करतात. बाणातून काढलेले धनुष्य आणि जीभेने बोललेले शब्द मागे घेता येत नाहीत. अब्दुल बारी सिद्दीकी यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. निखिल आनंद यांनी म्‍हटले आहे की, ' भारत आता राहण्यास योग्य नाही. भारतात परत येवू नका असे सिद्दीकी हे मुलाला विदेशात राहणार्‍या मुलाला सांगत होते. ते तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते आहेत. सिद्दीकी यांनी कट्टरतावादाच्या दहशतीबद्दल कधीही चिंता व्यक्त केली नाही. सिद्दीकी यांचे महिला आरक्षणावरील विधान अत्यंत निषेधार्ह आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news