नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन डेस्क : आकांक्षी ब्लॉक कार्यक्रमात ब्लॉक पंचायतींची मोठी भूमिका आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगाने काम केले तरच प्रत्येक गटाचा विकास वेगाने होईल. या कार्यक्रमाने ११२ जिल्ह्यांतील २५ कोटींहून अधिक लोकांचे जीवन बदलले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.३०) केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे देशातील महत्त्वाकांक्षी गटांसाठी 'संकल्प सप्ताह' या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते (PM Modi) बोलत होते.
हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान सुरू होईल. हा देशव्यापी कार्यक्रम 7 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केला होता. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ब्लॉक स्तरावर प्रशासन सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील 329 जिल्ह्यांतील 500 आकांक्षी ब्लॉकमध्ये याची अंमलबजावणी केली जात आहे. 'संकल्प सप्ताह' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता 'भारत मंडपम' येथे पोहोचले. (PM Modi)
'संकल्प सप्ताह' चा प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास थीमला समर्पित असेल ज्यावर सर्व 500 आकांक्षी ब्लॉक काम करतील. प्रगती मैदान येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशातील विविध राज्यांतील हस्तकला आणि कारागिरांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवले होते. पंतप्रधानांनी एकामागून एक सर्व स्टॉलला भेट दिली, तिथे ठेवलेल्या कलाकृती आणि उत्पादने पाहिली आणि ज्यांनी त्या बनवल्या त्यांच्याशी चर्चा केली. 'संकल्प सप्ताहा'च्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हेही उपस्थित होते.
'संकल्प सप्ताह' कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकसित भारताची प्रमुख अट ही आहे की आपल्या देशातील मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळाले पाहिजे. मी त्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. जे कठोर परिश्रम करतात आणि शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित भावनेने जगतात. ते पुढे म्हणाले की, देशात कोविड लसीचे २०० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत साजरे होणाऱ्या 'संकल्प सप्ताह' मध्ये, प्रत्येक दिवस एका विशिष्ट विकास थीमला समर्पित आहे ज्यावर सर्व महत्वाकांक्षी ब्लॉक्स कार्य करतील. पहिल्या सहा दिवसांच्या थीममध्ये 'पूर्ण आरोग्य', 'सु-पोषित कुटुंब', 'स्वच्छता', 'शेती', 'शिक्षण' आणि 'समृद्धी दिन' यांचा समावेश आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर 2023 रोजी, संपूर्ण आठवड्यात केलेले कार्य 'संकल्प सप्ताह – समारोप समारंभ' म्हणून साजरा केला जाईल.
हेही वाचा