सिंधुदुर्ग : कासार्डे येथे व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, मोबाईल पळवला

हल्ल्यात वापरण्यात आलेला सुरा
हल्ल्यात वापरण्यात आलेला सुरा

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाला. कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे जांभळगाव) याच्यावर पहाटे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांकडून चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. यावेळी प्रतिकार केल्यानंतर त्यांच्यांवर प्राणघातक हल्ला झाला. डंबे यांच्या नाकावर चोरट्यांनी ठोसा लावत जखमी केले.

हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी पोटात सुरा घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंबे यांनी प्रतिकार केला. डंबे यांनी आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले ते तीन जण सुमारे ३२ हजारांचा मोबाईल घेऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यात डंबे यांच्या नाकावर जखम झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी डंबे यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत प्रथमिक उपचार केले.

कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन अधिक तपास करीत आहेत. पहाटे झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमुळे घबराट निर्माण झालीय. या हल्ल्यामुळे महामार्ग पुन्हा एकदा हादरला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news