‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त टॉप ३ कार, किंमत 5 लाखांपेक्षाही कमी

Top 3 cheapest cars
Top 3 cheapest cars

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आपण नवी कार विकत घेण्याचा विचार करत असाल आणि आपले बजेट पाच लाख रुपयांपेक्षाही कमी असेल तर आज आम्ही आपल्यासाठी तीन अशा कार घेऊन आलो आहोत, ज्यांची सुरुवातीची किंमत पाच लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.

Datsun Redi Go

Datsun Redi Go ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे, जी कंपनीने सहा प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. Datsun Redi-Go चे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएमवर 54 PS ची पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 Nm चा टॉर्क जनरेट करते. तर, Redi-Goचे 1-लिटर इंजिन 5500 आरपीएमवर 68 PS ची पॉवर आणि 4250 आरपीएमवर 91 Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारचे इंजिन 5 स्पिड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेले आहे. कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह येते. याशिवाय कीलेस एंट्री, एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

मारुती एस-प्रेसो

मारुती एस्प्रेसो ही कार आकर्षक डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह एक मिनी एसयूव्ही आहे, जी कंपनीने तीन प्रकारांसह लॉन्च केली आहे. या एसयूव्हीमध्ये 998 सीसी इंजिन आहे, जे 1 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड गिअरबॉक्ससह 68 पीएस पॉवर आणि 90 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, रिअर पार्किंग सेन्सर्स, ABS आणि EBD सारखे फीचर्स देण्यातया कार मध्ये देण्यात आले आहे. मारुती एस्प्रेसोची सुरुवातीची किंमत 3.85 लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये गेल्यावर 5.56 लाखांपर्यंत जाते.

रेनॉल्ट क्विड

आकर्षक स्पोर्टी लुक आणि मजबूत इंजिन असलेल्या या कारची सुरुवातीची किंमत 4.06 लाख रुपयांपासून ते 5.51 लाख रुपयांपर्यंत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही नवे फीचर्स देण्यात आले आहेत. जरी डिझाइन, आकार आणि इंजिन यंत्रणा इत्यादी सारखीच आहेत, तरी कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कारमध्ये 999 सीसी इंजिन आहे हे 0.8 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 54 PS पॉवर आणि 72 Nm पीक टॉर्क जनरेट करते.कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी, रिव्हर्सिंग कॅमेरा, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्येया कारमध्ये देण्यात आली आहेत.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news