

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsWI T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सलामीवीर केएल राहुल, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतींमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत भारतीय संघ पहिल्या टी २० मध्ये कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
केएल राहुल आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी टी २० मध्ये भारतासाठी हिट ठरली आहे, विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहुलला दुखापत झाली. त्यामुळे तो टी २० मालिकेत खेळू शकणार नाही. राहुलच्या अनुपस्थित रोहित सोबत सलमीला कोण येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात इशान किशनचे नाव आघाडीवर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय डावाची तो सुरुवात करताना दिसू शकतो. (INDvsWI T20)
विराट कोहली फलंदाजीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल, त्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला पाठवले जाऊ शकते. तर, सूर्यकुमार यादवचा क्रमांक यानंतर येईल. प्रशिक्षक राहुल द्रविड देखील सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजीत बदल करू शकतात. श्रेयस अय्यरला फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर पाठवले जाण्याची शक्यता आहे. यानंतर गोलंदाजीसह फलंदाजीचे कौशल्य दाखवणाऱ्या दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांचा क्रमांक लागेल. (INDvsWI T20)
वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीनंतर कुलदीप यादवला टी-20 मालिकेत संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा युझवेंद्र चहल आणि कुलदीप यांना सोबत घेऊ शकतो. (INDvsWI T20)
दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्या जोडीला मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळेल असा दिग्गजांचा अंदाज आहे. हे तिघेही संघासाठी विकेट घेण्याचे काम करत आहेत. दीपक सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो तर शार्दुलही जमलेली जोडी तोडण्यात पटाईत आहे. (INDvsWI T20)
या मालिकेतील तिन्ही सामने केवळ ईडन गार्डनमध्ये खेळवले जातील. या मैदानाविषयी बोलायचे झाले तर येथे एकूण ८ टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ ३ वेळा विजय मिळवला आहे तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ५ वेळा विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर पहिल्या फलंदाजीची सरासरी १४८ आहे तर दुसऱ्या डावात १२४. तसे पाहता या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या २०१ ही आहे जी २०१६ च्या विश्वचषकात पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध केली होती. (INDvsWI T20)
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज