कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काढला नवा पक्ष

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काढला नवा पक्ष
Published on
Updated on

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास काँग्रेसने भाग पाडल्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष काढला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत अकाली दल आणि भाजपशी जागावाटपाबाबत बोलणी करणार असल्याचे सिंग यांनी आधीच सांगितले आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी सुरू असलेले वाद, त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवजोतसिंग सिद्धू यांनीही राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये जातील असे आडाखे बंधले जात होते. मात्र, अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी कॉग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे ते पक्षात थांबतील असे म्हटले जात होते. अखेर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आहे.

राज्यासाठी आणि देशाच्या हितासाठी…

'माझं राज्य आणि माझ्या देशाच्या हितासाठी मी काँग्रेसचा राजीनामा सादर करत आहे', असे त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना म्हटले आहे.

नव्या पक्षाचे नाव…

काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. 'पंजाब लोक काँग्रेस' असे नव्या पक्षाचे नाव ठेवले आहे.

मैत्रिणीवरून अडचणीत

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरुसा आलम हिच्यामुळे अडचणीत आले आहेत. सिंग मुख्यमंत्री असताना शासकीय निवासस्थानी साडेचार वर्षे राहिल्याने त्या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसने आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी खुले युद्ध पुकारले आहे. अमरिंदर यांची पाकिस्तानी पत्रकार मैत्रीण अरुसा आलम यांनाही राज्यातील काँग्रेस सरकारने चौकशीच्या घेर्‍यात घेतले आहे. अरुसा आलम यांच्या 'आयएसआय' कनेक्शनची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी शुक्रवारी सांगितले.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news