Man Udu Udu Zhala फेम इंद्रा- दिपूने घेतली राज ठाकरेंची भेट | पुढारी

Man Udu Udu Zhala फेम इंद्रा- दिपूने घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई; पुढारी ऑनलाईन: छोट्या पडद्यावरील मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Zhala ) ही मालिका चाहत्याच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची जोडी चाहत्यांना खूपच भावली. सध्या ( Man Udu Udu Zhala ) मालिकेतील अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबईत प्रचलित असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित लोकप्रिय कार्यक्रम ‘दीपोत्सव’ दरवर्षप्रमाणे यंदाही ‘शिवतीर्थ’ (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे संपन्न झाला. ऋता आणि अजिंक्य यांच्यासोबत सौ. शर्मिला राज ठाकरे, अमित ठाकरे, मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी ऋता आणि अजिंक्य यांनी माननीय राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव खूपच अविस्मरणीय असल्याची भावना दोन्ही कलाकारांनी व्यक्त केली.

या भेटीबाबत अजिंक्य राऊत म्हणाला की, ‘मन उडू उडू झालं ही मालिका आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेवर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम चाहते प्रेम करत आहेत. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत. आणि त्यामुळेच आम्हाला आज या मान्यवरांच्या उपस्थित ‘दीपोत्सव’ या सोहळ्याला येण्याचा बहुमान मिळाला.

यासाठी मी खरंच खूप आनंदी आहे. माननीय राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता असं मी म्हणेन.’ असे तो म्हणाला.

हेही वाचलंत का? 

Back to top button