कोल्हापूर : दीड लाखाची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास, दसरा चौकातील घटना | पुढारी

कोल्हापूर : दीड लाखाची रोकड असलेली बॅग हातोहात लंपास, दसरा चौकातील घटना

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दीड लाखाची रोकड असलेली बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. मंगळवार दुपारी बारा वाजता येथील मध्यवर्ती दसरा चौकात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे.

पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, फुलेवाडी कोतवाल नगर येथील पांडुरंग शामराव भोसले हे दुपारी येथील दसरा चौकात असलेल्या कॅनरा बँकेत रक्कम काढण्यासाठी आले होते बँकेतून दिड लाखाची रोकड काढून ठेवली. बँकेच्या दारात उभे राहिले असता अनोळखी तरुण तेथे आला मामा तुमचे जमिनीवर काही पडली आहे, असे सांगून भोसले यांचे लक्ष विचलित केले नेमके याच वेळी रोख रक्कम असलेली बॅग ताब्यात घेऊन चोरट्याने धूम ठोकली. हा प्रकार निदर्शनास येताच भोसले यांनी आरडाओरड केली. मात्र चोरटे पसार झाला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भुजबळ यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दसरा चौकात दाखल झाला. सीसीटीव्ही फोटोच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांनी हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा संशय आहे.

Back to top button