सिलेंडर स्फोट प्रकरण : आरोग्यमंत्र्यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना धरले धारेवर

सिलेंडर स्फोट प्रकरण : आरोग्यमंत्र्यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना धरले धारेवर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  अवैधरित्या टँकरमधून गॅस काढत असताना सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. ताथवडे येथे रविवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, आज सकाळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तसेच, जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत काहीजण टँकरमधून सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत होते. त्यावेळी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसने पेट घेतला. तसेच, टेम्पोही जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही तासात जवनांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

संबंधित बातम्या :

आज सकाळी तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जवळच शाळा, कॉलेज असल्यामुळे त्यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. सावंत म्हणाले की, संबंधित घटना दिवसा घडली असती, तर शेकडो जण जखमी झाले असते. ससूनमध्ये ड्रग्स माफिया सुरू आहे, तसेच येथे देखील गॅस माफिया सुरू आहे. आजच तीन ते चार अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. याबाबतची सर्व माहिती माझ्याकडे असून मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news