Market watch : फळभाज्यांसह पालेभाज्या महागच! | पुढारी

Market watch : फळभाज्यांसह पालेभाज्या महागच!

शंकर कवडे

पुणे : पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणार्‍या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी या फळभाज्यांसह फ्लॉवर, शेवगा, घेवडा, पावटा, मटारला मागणी वाढली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात दाखल होत असलेल्या फळभाज्यांच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने यांच्या भावात  दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील बटाटा विभागात पुणे व सातारा परिसरातून बटाटे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. परराज्याच्या बरोबरीने स्थानिक बटाटे बाजारात दाखल होऊ लागले आहे. रविवारी बाजारात 60 ते 65 ट्रकमधून बटाटा विक्रीसाठी दाखल झाला. त्यातुलनेत मागणी नसल्याने बटाट्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बहुतांश फळभाज्यांची आवक जावक कायम राहिल्याने त्यांचे दर स्थिर राहिले.

परराज्यांतील गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 8 ते 10 टेम्पो, कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, इंदौर येथून 5 ते 6 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग शेंग 2 ते 3 टेम्पो, बंगळूर येथून आले 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे आठ टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8 ते 10 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 4 ते 5 टेम्पो, कोबी 5 टेम्पो, ढोबळी मिरची 4 ते 5 टेम्पो, भुईमुंग शेंगा सुमारे 40 ते 60 गोणी, शेवगा 4 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 4 ते 5 टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून 40 ते 50 गोणी, कांदा सुमारे 115 ते 120 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 60 ते 65 ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button