पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल साडेपाच महिन्यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा (ST employees) तिढा आज अखेर सुटला. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. कर्मचाऱ्यांवर कारवाई नको, असे सांगत त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. उच्च न्यायालयाचा हा निर्णयानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदाेलन करणार्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले अखेर आमचा विजय झाला आहे. गेली अनेक दिवस चालेल्या आंदाेलनास अखेर यश मिळाले. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, अशी भावना काही कर्मचार्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?