पुढारी ऑनलाईन डेस्क : तू कधी लग्न करणार? असा प्रश्न नेहमी तब्बूला (Tabu) विचारला जायचा. देखणी, उंचीपुरी तब्बू मात्र अद्याप अविवाहित राहिलीय. तब्बूचा (Tabu)लग्न करण्याचा मानस अद्यापही कुठे दिसत नाही. नव्वदीच्या दशकातील काळ गाजवणाऱ्या तब्बूचे नाव कदी अजय देनगन तर कधी साऊथ स्टार नागार्जनसोबत जोडलं गेलं होतं. तब्बूसारखी सहनशीलता केवळ तिचं ठेवू शकते. आपल्या प्रियकराची वाट पाहण्यात तिने तब्बल १० वर्षेदेखील घालवले आहेत. पण, प्रियकर कधीच तिचा जोडीदार होऊ शकला नाही.
तब्बू अद्यापपर्यंत सिंगल राहण्यामागे कहाणी सांगितली जाते. तब्बूची खरी लव्हस्टोरी असली तरी ती अधुरी प्रेमकहाणी आहे. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री तबस्सुम फातिमा हाशमी उर्फ तब्बूने बालकलाकार म्हणून बालकलाकार म्हणून काम केलं आहे.
ती सिंगल राहण्यामागं तब्बूने अनेकदा अजय देवगनला जबाबदार ठरवलं आहे. ती तिच्या वयापेक्षा ३० वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत अफेअर आणि १० वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतरेदखील अखेर तब्बू सिंगल का राहिली?
४ नोव्हेंबर, १९७० रोजी हैदराबादमध्ये तब्बूचा जन्म झाला. तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८० मध्ये रिलीज झालेला चित्रपट बाजार मधून केली होती. या चित्रपटात तिची एक छोटी भूमिका होती. परंतु, वयाच्या १४ व्या वर्षी तिला नौजवानमध्ये देवानंद यांच्या मुलीची भूमिका साकारली. या चित्रपटातून तिला चित्रपट इंडस्ट्रीत ओळख मिळाली.
तब्बूने मुख्य अभिनेत्री म्हणून बोनी कपूरचा चित्रपट प्रेम साईन केला. या चित्रपटामध्ये तब्बू संजय कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. परंतु, हा चित्रपट बनवण्यात जवळपास ८ वर्षांचा काळ लागला. 'पहला पहला प्यार' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये आपला दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात ती यशस्वी झाली. माचिस, कालापानी, अस्तित्व, चांदनी बार, मकबूल यासारखे अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून मुख्य भूमिका साकारली होती. तब्बू चित्रपटांबरोबरचं आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती.
तब्बूचं साऊथ स्टार नागार्जुनसोबतचं लव्ह रिलेशनशीपविषयी सर्वश्रुत आहे. अक्किनेनी नागार्जुनसोबत तब्बू जवळपास १० वर्षे रिलेशनशीपमध्ये होता. तब्बूला डेट करणारा नागार्जुन आधीपासून विवाहित होता. तरीही तब्बू आणि नागार्जुन एकत्र होते. १० वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर तब्बूला कळालं की, तो तिच्यासाठी आपल्या पत्नीला सोडू शकत नाही. त्यानंतर तब्बू नागार्जुनपासून दूर गेली. नागार्जुनसोबतचं आपलं अफेअर तब्बूने अनेक मुलाखतीत स्वीकारलं आहे.