निधी भानूशाली : ‘तारक मेहता’च्या सोनूच्या ‘मिस्ट्री बॉय’वरून एकच गॉसिपिंग

nidhi bhanushali
nidhi bhanushali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानूशाली ट्रेंडवर आलीय. निधी भानूशाली सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. निधीच्या मिस्ट्री बॉयविषयीचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. अभिनेत्रीने या मिस्ट्री बॉयवरून मौन सोडले आहे.

व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर लोक अंदाज लावताहेत की, हा निधीचा बॉयफ्रेंड तर नाही! निधीने एका मुलाखतीत या मिस्ट्री बॉयविषयी मौन सोडले आहे.

मुलाखती दरम्यान, निधीने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ऋषी अरोरा नावाच्या मुलासोबत तिचे जे फोटो समोर आले होते, तो केवळ तिचा मित्र होत. तो वर्क पार्टनर आहे. ती म्हणाली- मी त्याला डेट करत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी मित्र असू शकत नाहीत? निधी म्हणाली-डेटिंग करणं सर्वकाही असू शकत नाही. मी ऋषीसोबत छान असते. मी त्याच्यासोबत माझी पूर्ण लाईफ शेअर करते. यासाठी गरजेचे नाही की, मला कुठल्याही बॉयफ्रेंडचं लेबल चिटकवावं.

निधीच्या या म्हणण्यावरून स्पष्ट आहे की, ती ऋषीला डेट करत नाहीये. पण, तिच्या आयुष्यात त्याचं खूप महत्त्व आहे. निधीने ऋषी अरोरासोबत एक लेटेस्ट रोड ट्रिप विषयी सांगितले की, दोघे एकत्र महाराष्ट्र, लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या जवळपास फिरायला गेले होते. या ट्रिपवेळी दोघे अनेकदा टेंटमध्ये राहिले.

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम निधीला 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या निर्मात्यांनी ॲफर दिली होते. पण, रोड ट्रिपमुळे तिने नकार दिला होता.

सोनूची भूमिका चर्चेत

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये आत्माराम भिडेची मुलगी सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. झील वयाच्या ९ व्या वर्षांपासून या मालिकेशी संबंधित होती. वयाच्या १४ व्या वर्षांपर्यंत ती या मालिकेत काम करत होती. शिक्षणासाठी तिने ही मालिका सोडली. झीलनंतर निधीने सोनूची भूमिका साकारली. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. निधीनेदेखील २०१९ मध्ये आपल्या शिक्षणासाठी मालिका सोडली. नंतर तिच्या जागी पलक सिधवानीने भूमिका साकारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news