The Kerala Story बंदीवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती; पश्चिम बंगाल सरकारला दणका

The Kerala Story
The Kerala Story

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरला स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. (The Kerala Story) ८ मे रोजी पश्चिम बंगाल सरकारने द केरला स्टोरी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या बंदीविरोधात चित्रपटाचे निर्माते सुप्रीम कोर्टात गेले होते. (The Kerala Story)

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात शांतता राहावी, यासाठी चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारनेही असा निर्णय देत प्रदर्शनावर बंदीची घोषणा केली होती. दरम्यान द केरला स्टोरीच्या निर्मात्यांनी या प्रदर्शनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत प्रदर्शनावरील बंदी उठवावी, अशी मागणी केलीय.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने द केरल स्टोरीच्या निर्मात्यांच्या याचिकेवर पश्चिम बंगाल सरकारला नोटिस बजावली . ज्यामध्ये राज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्य़ात आले.

"हा चित्रपट देशभर प्रदर्शित होत आहे, पण पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटावर बंदी का घातली, तुम्ही तो का चालवू नये? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला होता. हा चित्रपट देशाच्या विविध भागांमध्ये सुरु आहे. याचा चित्रपटाच्या सिनेमॅटिक मूल्यांशी काहीही संबंध नाही, तो चांगला किंवा वाईट असू शकतो," असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news