Priynka Chopra : प्रियांका चोप्रा ठरली ग्लोबल कव्हर स्टार | पुढारी

Priynka Chopra : प्रियांका चोप्रा ठरली ग्लोबल कव्हर स्टार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांका चोप्रा ग्लोबल 🌎 आयकॉन झालीय. (Priynka Chopra) एका उत्तम अभिनेत्री म्हणून तिने या महिन्यात टॉप महिला फॅशन मासिकाच्या १२ आवृत्त्यांच्या कव्हर पेजवर आपले स्थान निर्माण केले आहे. यासाठी प्रियांका चोप्राने डाय पेट्साच्या मरून ड्रेसमध्ये पोझ दिली आहेत. आणखी काही फोटोंमध्ये ती स्पोर्टमॅक्सच्या ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. (Priynka Chopra)

या प्रत्येक कव्हरपेजसाठी प्रियांका चोप्राने सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत. एका कव्हर पेजवर निळ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये आणि पांढर्‍या बुटांमध्ये ती दिसत आहे. आणखी एका पेजवर प्रियांका चोप्रा गुलाबी ब्लेझर आणि व्हॅलेंटिनोच्या स्कर्टमध्ये आकर्षक दिसते. तिसऱ्या पेजवर प्रियांका चोप्रा अल्बर्टा फेरेटीच्या केशरी हुडी ड्रेसमध्ये दिसतेय.

तिचा हा खास आनंद व्यक्त करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे त्यात ती लिहिते ” ग्लोबल कव्हर स्टार होण्याचा खूप आनंद आहे @graziauk ! जगभरातील १२ कव्हर वर येणं हा एक छान योग होता धन्यवाद ग्राझिया!

या महिन्यात मेट गाला आणि तिच्या रोमँटिक कॉमेडी, लव्ह अगेनच्या प्रीमियरमुळे सर्वाधिक चर्चा झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Back to top button