मणिपूरमधील पीडित महिलांचे आज दुपारी दोनपर्यंत जबाब नोंदवू नका : सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सीबीआयला आदेश

सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमध्‍ये विवस्‍त्र अवस्‍थेत महिलांच्‍या धिंड काढलेल्‍या पीडित महिलांचे आज (दि.१) दुपारी दोन वाजेपर्यंत जबाब नोंदविण्‍यात येवू नयेत, असा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. आज दुपारी दोन वाजता याप्रकरणी दाखल याचिकांवर पुन्‍हा सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीबीआय अधिकार्‍यांनी आज न्‍यायालयात हजर राहण्‍यास सांगितले आहे.

मणिपूरमधील महिलांवर अत्‍याचाराचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पीडित महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केले, हा तर भयंकर हिंसाचाराचा प्रकार आहे, अशी टिपण्‍णी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी ( दि. ३१) केली होती. मणिपूरमध्‍ये महिलांवर अत्‍याचाराची घटना ४ मे रोजी घडली; मग १८ मे रोजी गुन्‍हा कसा दाखल झाला?, ४  ते १७ मे या कालावधीत स्‍थानिक पोलीस काय करत होते, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला होता. ( Manipur viral video case )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news