Sunil Jakhar : ‘गूड लक अँड गूडबाय काँग्रेस’ : सुनील जाखड यांची पक्षाला सोडचिठ्‍ठी

Sunil Jakhar : ‘गूड लक अँड गूडबाय काँग्रेस’ : सुनील जाखड यांची पक्षाला सोडचिठ्‍ठी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

एकीकडे उदयपूरमध्‍ये पक्षाचे नवसंकल्‍प शिबीर सुरु असतानाच दुसरकुडे 'गूड लक अँड गूडबाय काँग्रेस' असे फेसबुकच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट करत पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष सुनील जाखड यांनी पक्षातून बाहेर पडत असल्‍याचे जाहीर केले.  नुकतेच पक्षाने त्‍यांच्‍यावर शिस्‍तभंगप्रकरणी कारवाई केली हाेती. तसेच त्‍यांची सर्व पदावरुन हकालपट्‍टीही करण्‍यात आली होती. अखेर आज त्‍यांनी अधिकृतपणे पक्षातून बाहेर पडत असल्‍याचे जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

Sunil Jakhar : पक्षाने चिंतन नव्‍हे चिंता करण्‍याची गरज

फेसबूक लाईव्‍हवेळी जाखड म्‍हणाले की, काँग्रेसचे नेतृत्‍व हे खोटी स्‍तुती करणार्‍यांच्‍या गराड्यात अडकले आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्‍यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षांना आवाहन केले की, तुम्‍ही संपूर्ण देशात राजकारण करा;पण पंजाबला तेवढे सोडा. पक्षाच्‍या नेत्‍या अंबिका सोनी या हिंदुंना बदनाम करत आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला.

राजस्‍थानमध्‍ये पक्षाच्‍या वतीने आयोजित चिंतन शिबीर हे केवळ औधचारिकता आहे. पक्षातील काही नेत्‍यांचा मुखवटा उतरविण्‍याची गरज आहे. आज काँग्रेस पक्षाची स्‍थिती खूपच गंभीर झाली आहे. त्‍यामुळेच चिंतन शिबीराचा पक्षाला काहीच फायदा होणार नाही. पक्षाने स्‍वत:च रणनीती ठरवावली लागेल. काँग्रेस पक्षाने चिंतन नव्‍हे तर चिंता व्‍य्‍कत करण्‍याची गरज आहे, अशी टीका जाखड यांनी केली.

माझी सर्व पदांवरुन हकालपट्‍टी केली असे पक्ष सांगत असला तरी मी कोणत्‍याही पदावर नियुक्‍त नव्‍हतोच. माझा काँग्रेस पक्षाबरोबर गेली ५० वर्षांहून अधिक काळ नातं आहे. मी नेहनीच काँग्रेसचा एक शिस्‍त पाळणारा कार्यकर्ता असेच मी काम केले आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news