राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण म्हणाल्‍या, “कोण नवनीत राणा? त्या पूर्वी बारमध्ये…” | पुढारी

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण म्हणाल्‍या, "कोण नवनीत राणा? त्या पूर्वी बारमध्ये..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि ठाकरे सरकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. राणा दाम्पत्यांच्या ठाकरे सरकारविरोधात छेडलेल्‍या आंदोलनात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी बोचरी टीका केली आहे. “कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना एवढं महत्त्‍व का द्यायचं?”, असा सवाल त्‍यांनी केला.

या वेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की, “कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्‍या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्त्‍व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी राणा दाम्पत्य असा प्रकार करत असतं, असा आराेपही त्‍यांनी केला.

“राणा दाम्पत्य अमरावतीत काय करतं हे सर्वांना माहीत आहे. रवी राणा यांनी निवडणुकीवेळी प्रेशर कुकर वाटले होते. त्यांना झाकणच नव्हतं म्हणून सगळ्या महिला त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावर रवी राणांनी तुम्ही मला मतदान करा; मग झाकण देतो असं म्हटलं होतं. यावरुन यांची कुवत लक्षात येते”, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

पाहा व्हिडीओ : संभाजीराजेंनी केली नव्या संघटनेची घोषणा | युवराज संभाजीराजे छत्रपती 

हे वाचलंत का? 

Back to top button