उन्हाळा आणि आरोग्य : आला आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

Summer
Summer

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडाक्याची थंडी संपताच, रखरखता उन्हाळा जाणवायला लागतो. प्रखर उन्हामुळे उष्माघात किंवा त्वचाविकार होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रतिबंधक उपचारासोबतच काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. मार्चपासूनच उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू होतो. त्यामुळे उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी 'काय करावे' आणि 'काय करू नये' याविषयी जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा…

काय करावे

  • जास्तीत पाणी प्यावे.
  • हलकी, पातळ व सच्छिंद्र सुती कपडे वापरावेत.
  • घराबाहेर पडताना, गॉगल्स, टोपी, छत्रीचा वापर करावा.
  • प्रवासात पाण्याची वाटली सोबत ठेवावी.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच चेहरा, मान रूमाल ओला करून सातत्याने पुसावे.
  • उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने, ओ. आर.एस, लिंबू सरबत, ताक यांचे दैनंदिन सेवन करावे.
  • आंघोळीसाठी वेळोवेळी थंड पाण्याचा वापर करावा.
  • कष्टाची कामे पहाटेच्या वेळात करावीत, कडक उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत आराम करावा.
  • सतत येणारा घाम, स्थूलपणा डोकेदुखी, चक्कर येणे हे सातत्याने जाणवत असल्यास, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • या दिवसात गरोदर महिला व आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.
  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा.
  • घर, स्वयंपाक खोलीची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात, मोकळी हवा आतमध्ये येऊ द्यावी.
  • प्रशासनाने उन्हापासून संरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला शेड उभारावेत आणि जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.

काय करू नये

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
  • तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
  • दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.
  • गडद रंगाचे, घट्ट, जाड कापडाचे कपडे घालणे टाळावे.
  • खास करून स्त्रियांनी उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे.
  • चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा, कारण हे पदार्थ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून, उष्णता वाढवतात.
  • या दिवसात शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news