पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) २२५ अंकांनी घसरून ६७,६०० वर होता. तर निफ्टी (Nifty) ४८ अंकांच्या घसरणीसह २०,१४४ वर आहे. आज सुरुवातीलाच आयटी शेअर्समध्ये अधिक घसरण दिसून आली. (Stock Market Opening Bell)
संबंधित बातम्या
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो, रिलायन्स, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर एम अँड एम, पॉवर ग्रिड, एसबीआय, एशियन पेंट्स, टाटा स्टील, एनटीपीसी, सन फार्मा हे शेअर्स हिरव्या चिन्हात खुले झाले आहेत. (Stock Market Opening Bell)
हे ही वाचा :