नव्या यशोशिखरावर शेअर बाजार

नव्या यशोशिखरावर शेअर बाजार

Published on

अखेर, निफ्टीचं गंगेत घोडं न्हालं! 20,000 चा टप्पा निफ्टीने नुसता पारच केला नाही, तर सप्ताहाच्या अखेरीस 20,000 च्या वर टिकून राहिला. हे दस हजारी आकडे रिटेन इन्व्हेस्टर्सच्या मानसिकतेत खूप मोठे बदल घडवून आणतात. त्यामुळे ते पार होणे म्हणजे बाजाराने तेजीच्या वेगवान वारूवर स्वार होणे. निफ्टी सेन्सेक्स जवळपास दोन टक्क्यांनी, तर बँक निफ्टी दोन टक्क्यांच्या वर वाढून New High चे आकडे दर्शवत आहेत.

निफ्टी 20192.35
सेन्सेक्स 67838.63
बँक निफ्टी 46231.50

आता निफ्टीपुढे 21,000 चे सेन्सेक्सपुढे 70,000 चे तर बँक निफ्टीपुढे 50,000 चे ध्येय असेल.
परदेशी वित्त संस्थांची विक्रीची मालिका अद्याप सुरूच आहे. (-746.60 कोटी). मात्र देशी वित्त संस्थांनी या सप्ताहात रु. 3363.40 कोटींची भरघोस खरेदी केली.

Nifty media वगळता सर्व प्रमुख आणि सेक्अरल निर्देशांक तेजीत राहिले. परंतु, सगळ्यात कमाल केली Nifty PSU Bank ने. साडेसात टक्क्यांनी हा निर्देशांक आठवड्यात वाढला. जेव्हा आपण बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या नजरेपुढे नेहमी एसबीआय, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक अशा मोठ्या बँकाच असतात. परंतु एरव्ही आपण ज्यांचा विचारही करत नाही, अशा सरकारी बँकांनी आपल्या NPA Recovery वर जोर दिला. Provisious चे आकडे कमी केले तर आपली Asset Quality लक्षणीयरित्या सुधारली. या बँकांची गेल्या तीन महिन्यांतील कामगिरी पहा.

ITI ही कम्युनिकेशन्स सेक्टरच्या सेवा पुरविणारी कंपनी. या कंपनीचे ROE, ROCE चे आकडे निगेटिव्ह आहेत. सेल्स ग्रोथचा आकडा निगेटिव्ह आहे. मार्च 2023 मध्ये कंपनीने 360 कोटी रु. तोटा दर्शवला आहे. तरीही हा शेअर त्या सप्ताहात 54 टक्के वाढून रु. 197 वर बंद झाला. कारण कंपनीने Intel च्या सहकार्याने SMAASH या आपल्या नवीन लॅपटॉप आणि मायक्रो पीसींची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर अलशी, HP, Dell, Lenovo यांसारख्या मल्टिनॅशनल ब्रँडसची तगडी स्पर्धा असतानाही मोठमोठी टेंडर्सही मिळाल्याचा दावा केला.

या सप्ताहात एकूणच बाजाराने विक्रम नोंदविला. निफ्टी स्मॉप कॅप आणि मिडकॅप इंडायसेस ही उच्चांकी पातळीवर आहेत. परंतु, 12 सप्टेंबर रोजी अचानक स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली. निफ्टी मिड 100 हा निर्देशांक तीन टक्के घसरला, तर निफ्टी स्मॉप 100 हा 4 टक्के घसरला. त्यामुळे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये नव्याने करेक्शन येईल का, अशी बाजारात चर्चा सुरू आहे.

मध्यम हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपल्याला चांगले शेअर्स शोधायचे असतील तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक अतिशय विश्वसनीय मार्ग आहे, तो म्हणजे प्रायव्हेट इन्श्युरन्स कंपन्या कोणते शेअर्स खरेदी करतात ते पाहणे. ICICI Prudential life, HDFC Life, Tata AIA Life णि Kotak Life र प्रमुख इन्श्युरन्स कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात खालील शेअर्समध्ये भरघोस खरेदी केली.
1) Bajaj Finance, 2) Interglobe Aviation (Indigo), 3) Union Bank, 4) Star Health, 5) Coforge, 6) Zomato, 7) Tata Steel, 8) KPR mill, 9) Sun Tv, 10) Bayer Crop Science, 11) L & T Tech Services, 12) Equit as small finance bank.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news